शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सहायक फौजदार लाचेच्या सापळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:39 IST

चंदनझिरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला सहकायक फौजदार दिलीप कचरूसिंग ठाकूर याला एसीबीने पाच हजार रूपयांची लाच स्वीकारताना गुरूवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील चंदनझिरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला सहकायक फौजदार दिलीप कचरूसिंग ठाकूर याला एसीबीने पाच हजार रूपयांची लाच स्वीकारताना गुरूवारी अटक केली. यापूर्वी संबंधितांकडून ठाकूर याने १० हजार रूपयांची लाचेची रक्कम घेतली होती, ही लाच ठाकूरने पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींना मारहाण न करण्यासह जामीन मिळवून देण्यास मदत करण्याच्या नावाखाली घेतल्याचे एसीबीने सांगितले.चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीत आठवड्याभरापूर्वी झालेल्या एका भांडणातील सहा आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी संबंधित संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. यावेळी पोलीस कोठडीत मारहाण न करण्यासह पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर जामीन मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न करावयाचे असल्यास १८ हजार रूपयांची लाच द्यावी लागेच असे ठाकूरने सांगितले होते. दरम्यान, यापूर्वी याच प्रकरणात तडजोड होऊन १५ हजार रूपये देण्याचे ठरले. त्यानुसार त्यातील दहा हजार रूपये ठाकूरने स्विकारले होते.उर्वरित पाच हजार रूपयांची लाच देण्याचा तगादा ठाकूरने संबंधितांकडे केला होता. तत्पूर्वी तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने एसीबीकडे ठाकूर यांची तक्रार केली. तसेच मोबाईलवरून संपर्क करून पाच हजार रूपये देण्यासाठी कुठे यावे अशी विचारणा केली असता, ठाकूरने नूतन वसाहत परिसरातील एका हॉटेलमध्ये येण्याचे सांगितले. त्यानुसार गुरूवारी पाच हजार रूपयांची लाच घेतांना ठाकूरला एसीबीने सापळा लावून रंगेहात पकडले. त्याला अटक करण्यात आली असून, कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारArrestअटक