शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

अ‌वैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST

संजयनगर येथे घरफोडी जालना : घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करून २५ हजार रुपयांचा मुद्देमाल ...

संजयनगर येथे घरफोडी

जालना : घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करून २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना जालना शहरातील संजयनगर येथे बुधवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी रवींद्र रामसिंग गोफणे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राठोड करीत आहेत.

मिरचीच्या आठ गोण्या चोरी

जालना : शेतातील झोपडीत ठेवलेल्या सात हजार २०० रुपयांच्या मिरचीच्या गोण्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री पिंपळगाव रेणुकाई परिसरात घडली. या प्रकरणी ज्ञानेश्वर आहेर यांच्या फिर्यादीवरून संशयित विष्णू नाटोबा क्षीरसागर, अनिल कौतिक आहेर (दोघे रा. पिंपळगाव रेणुकाई) यांच्याविरुद्ध पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा

जालना : जालना शहरातील कैकाडी मोहल्ला येथे सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ४ हजार २०० रुपयांची दारू जप्त केली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चेके यांच्या फिर्यादीवरून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दुचाकीतून पेट्रोल चोरणारा अटकेत

जालना : घरासमोर उभा असलेल्या दुचाकीतून पेट्रोल काढणाऱ्यास रंगेहात पकडण्यात आल्याची घटना गुरुवारी अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे घडली. या प्रकरणी केशव तट्टूपाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित गजानन चैनसिंग गोलवाल (रा. हसनाबाद वाडी, जि. औरंगाबाद) याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.