बदनापूर : सन २०१४-१५ च्या एक कोटी ४२ लाख रूपयांच्या सुधारीत अर्थसंकल्पास व २०१५-१६ च्या २० लाख रूपयांच्या मुळ अर्थसंकल्पास बदनापूर पंसच्या एका विशेष सभेत मंजुरी देण्यात आलीपंचायत समितीमधे पंस सभापती अदनान सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका विशेष सभेत या दोन्ही अर्थसंकल्पास चर्चा करण्यात आली व त्यानंतर मंजुरी देण्यात आली यावेळी पंस सदस्य रावसाहेब भवर यांनी सन २०१४-१५ साठी कृषि विभागासाठी ठेवण्यात आलेल्या एक लाख रूपये निधीचा खर्च झाला नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली या बैठकीबाबत सभापती अदनान सौदागर म्हणाले की आजच्या विशेष सभेत अर्थसंकल्पातील हा निधी गावातील रस्ते, महिला व अपंगांच्या योजना,पाणी शुध्दीकरणासाठी ब्लिचिंग पावडर वाहन,कृषि योजना अशा विविध बाबींवर खर्च करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली व नंतर त्यास मंजुरी देण्यात आली या बैठकीस दहा पंस सदस्यांपैकी सात पंस सदस्य उपस्थित होते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दीड कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी
By admin | Updated: February 11, 2015 00:26 IST