शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

४४ कोटी ६५ लाख ४९ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 00:14 IST

सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षासाठी ४४ कोटी ६५ लाख ४९ हजार ३०७ रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरोनाबाबत खबरदारी म्हणून सोमवारी आयोजित जालना जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा रद्द करण्यात आली. परंतु, सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षासाठी ४४ कोटी ६५ लाख ४९ हजार ३०७ रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.सोमवारी जालना जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा ठेवण्यात आली होती. परंतु, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही सभा रद्द करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सदस्यांच्या स्वाक्षºया घेऊन ४४ कोटी ६५ लाख ४९ हजार ३०७ रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. यात वित्त विभागासाठी २५ लाख, सार्वजनिक मालमत्तेच्या परिरक्षणासाठी ६ कोटी ४२ लाख ५५ हजार ५३८, पाणी पुरवठा व स्वच्छता ५ कोटी ५० लाख, अनुसूचित जाती, जमाती व इतर दुर्बल घटकांच्या कल्याणसाठी ३ कोटी ८६ लाख ५०००, महिला व बालकल्याण २ कोटी ४० लाख ८०००, कृषी विभागासाठी ३ कोटी ७० लाख ८१ हजार, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालनासाठी ६४ लाख ५५ हजार, पंचायतराज कार्यक्रमासाठी २ कोटी ५१ लाख २२ हजार ६००, लहान पाटबंधारे विभागासाठी २ कोटी ४० लाख २ हजार, परिवहन रस्ते १३ कोटी ७१ लाख, व्यपगत ठेवीसाठी ५० हजार रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.यासह विषय सूचीवरील सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनास २०१९-२० या वर्षात जमीन महसूल ४ कोटी ४५ लाख, मुद्रांक व नोंदणी शुल्क ४ कोटी ३१ लाख ३२ हजार, व्याजाच्या रकमेतून १५ कोटी ९४ लाख ९६ हजार ९९२ रूपये, सार्वजनिक मालमत्तेतून २१ लाख, यासह इतर विभाग मिळून प्रशासनास ५९ कोटी ७७ लाख ३६ हजार ६५४ रूपयांचा महसूल जमा झाला आहे.२०२० - २१ आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात आरोग्य व शिक्षण विभागाला कमी निधी देण्यात आला आहे. शिक्षणासाठी १ कोटी ६९ लाख ५५ हजार तर आरोग्यासाठी १ कोटी २३ लाख २ हजार रूपयांचा निधी देण्यात आला होता. गतवर्षी शिक्षण विभागाला १ कोटी ४४ लाख ८८ हजार ८३३ तर आरोग्याला ९५ लाख ५० हजार रूपयांचा निधी देण्यात आला होता. यावर्षीही या दोन्ही विभागांना कमी निधी देण्यात आला आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदbudget 2020बजेटcorona virusकोरोना वायरस बातम्या