चौकट
प्रशासनाने आपत्ती निवारण व साथ रोग कायद्यानुसार कोरोना संसर्गाची चाचणी सक्तीची केल्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात घबराट होती. अशा वेळेस जिल्हा व्यापारी महासंघाने पुढाकार घेऊन प्रशासनाच्या मदतीने व्यापाऱ्यांना ही चाचणी शहराच्या मध्यवर्ती भागात उपलब्ध करून दिलेली आहे तरी सर्व व्यापारी बांधवांनी याचा लाभ घ्यावा.
-विनित साहनी, प्रभारी अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ
-----
चौकट
जालना जिल्हा व्यापारी महासंघ हा प्रशासनाच्या मदतीने व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत आलेला आहे. कोरोना संसर्गाची पार्श्वभूमीवर सर्व व्यापाऱ्यांनी शासनाने घालून दिलेल्या सुरक्षा नियमाचे तंतोतंत पालन करून आपत्ती निवारण व साथरोग कायद्यानुसार प्रशासनाकडून होणारी कायदेशीर कारवाई टाळावी.
-श्याम लोया, कार्यकारी सचिव, जिल्हा व्यापारी महासंघ
-----
चौकट
जालना जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने व जिल्हा परिषद व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनजागृती अभियानांतर्गत कोरोना संसर्गाच्या चाचणी करून घेण्यासाठी जो भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे फार आभार.
-राजेश कामड व संजय रुईखेडकर, प्रकल्पप्रमुख जिल्हा व्यापारी महासंघ
-------
चौकट
आपत्ती निवारण व साथ रोग कायद्यानुसार सर्व व्यापाऱ्यांना कोरोनाची चाचणी करून घेणे आवश्यक होते. जालना जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या मदतीने शहराच्या मध्यवर्ती भागात रॅपिड अँटिजन टेस्टची व्यवस्था केल्यामुळे व्यापाऱ्यांना ही चाचणी करून घेणे सोयीस्कर झाले. याबद्दल जिल्हा व्यापारी महासंघाचे फार फार धन्यवाद.
-भरत गादिया, सराफा असोसिएशन जालना
-----------------------