जालना : जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यकारिणीत सर्व समाज घटकातील पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली असून, जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अब्दुल हाफीज अब्दुल गफ्फार यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी दिली.जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षासह जिल्ह्यातील आठही तालुक्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर या जिल्हा कार्यकारिणीत १३ उपाध्यक्ष, १४ सरचिटणीस, २३ सचिव, कोषाध्यक्ष व कार्यालयीन सचिव प्रत्येकी एक, ३४ निमंत्रित सदस्य आणि २१ कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अब्दुल हाफिज अब्दुल गफ्फार, जालना तालुकाध्यक्षपदी वसंत जाधव, बदनापूर तालुकाध्यक्ष परमेश्वर गोते, भोकरदन तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव पाबळे, जाफराबाद तालुकाध्यक्ष संदीप कड, अंबड तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राजपूत, घनसावंगी तालुकाध्यक्ष विष्णूपंत कंटुले, परतूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब गाडगे, मंठा तालुकाध्यक्षपदी निळकंठ वायाळ यांची निवड करण्यात आली आहे.कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र राख, किसनराव मोरे, लक्ष्मण दळवी, ज्ञानदेव पायगव्हाणे, मो. एकबाल कुरेशी, प्रभाकर पवार, महेश सारस्वत, बद्रीनारायण खवणे, गणी भिकन पटेल, मारोतराव मदन, विजय चौधरी, बबनराव पाटील, केशव पाटील जंजाळ, जिल्हा सरचिटणीसपदी अॅड. हर्षकुमार जाधव, अण्णासाहेब खंदारे, राम सावंत, शेख महेमूद अ. कादर, अॅड. राहुल चव्हाण, अॅड. विनायकराव चिटणीस, पारसनंद यादव, आलमखान पठाण, रियाजोद्दीन खतीब, ज्ञानेश्वर शिंदे, साहेबराव झोरे, डेव्हिड घुमारे, सुरेश तळेकर, शरद देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी अंकुशराव राऊत, श्रीराम पुंगळे, भाऊसाहेब सोळुंके, सूर्यभान मोरे, अजगर अलिखान, अशोक देशमुख, जयराम राठोड, वसंत डोंगरे, संजय शेजूळ, अॅड. राहुल हिवराळे, सय्यद अली सय्यद आरेफ अली, चंद्रकांत पगारे, अब्दुल कय्यूम कुरेशी, शेख कैसर शेख मुसा, अल्ताफ खॉ पठाण, एजाज जमीनदार, शामसुंदर काळे, अॅड. मधुकरराव मोरे, महादेव घेंबड, शेख जलील शेख अब्दुल्ला कुरेशी, जावेदखान पठाण, राजेश काळे, वसंतराव थोरवे यांचा समावेश आहे. तसेच कोषाध्यक्षपदी नरेंद्र मित्तल तर कार्यालयीन सचिवपदी किशोर आगळे यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त सदस्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर
By admin | Updated: January 17, 2017 00:39 IST