शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST

जालना : विरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ...

जालना : विरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. राज्याध्यक्ष अरूण जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रभाकर काकडे, पी.डी. चव्हाण, शांतीलाल खरात, बबन दवंडे, श्रीकांत बागल, बाळू तोटकर, शेख जिलानी, एस.एल. ढाकणे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात सुनंदा ढाकणे, मनीषा हिवाळे, प्रतीक्षा डहाळे, मयुरा वाकडीकर, कांचन खरात, अनुजा पुजारी, सरिता दगडू, हेमा शिंदे, सीमा बिराजदार, सारिका पवार, राजश्री चव्हाण, सुनीता बिडकर, मधुमती सुरासे यांचा सत्कार करण्यात आला.

---------------------------------

फोटो

प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, जालना

जालना : प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मराठवाडा विभाग अध्यक्ष संतोष राजगुरू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष बळीराम काळे, रमेश फटाले, शेख, राजेंद्र लबासे, ए.आय. मोमिन, सुरेश धानुरे, फारुख सय्यद, दत्ता वाघमारे, गिरिधर राजपूत आदींची उपस्थिती होती.

-----------------------------------------

फोटो

जि.प. शाळा, पारडगाव

पारडगाव : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बी. डी. बागल, सिध्दीका पठाण, हुमा दायमी, अर्जुन खरात, नामदेव आव्हाड यांची उपस्थिती होती.

---------------------------------------

ओमशांती विद्यालय, झिरपी

वडीगोद्री : झिरपी येथील ओमशांती विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक एन. बी. पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक एन. बी. पगारे, त्रिंबक हामणे, विठ्ठल राठोड, बप्पासाहेब सुबुगडे आदींची उपस्थिती होती.

----------

साई कँम्ब्रीज इंग्लिश स्कूल, जालना

जालना : येथील साई कँम्ब्रीज इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरणकुमार भुते, कपील भुते, कमलाबाई भूते, दिपाली भूते, गणेश शेवाळे आदींची उपस्थिती होती.

-----------------------------------------------

फोटो

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुंडेवाडी

जालना : गुंडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी शिक्षिका सरस्वती पवार, लता गजर, मुख्याध्यापक रवींद्र कार्लेकर, शिक्षक सुनील साबळे यांची उपस्थिती होती.

-----------------------------------

फोटो

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, दहीपुरी

अंबड : तालुक्यातील दहीपुरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य एस. यु. मोरे, शिक्षक शेख, जायभाये, राठोड, पटेल, उगले, ठाकुर आदींची उपस्थिती होती.

---------------------------------

शांतिनिकेतन विद्या मंदिर, जालना

जालना : जालना शहरातील संभाजीनगर प्रभागातील शांतिनिकेतन विद्या मंदिर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती विमल पाखरे, शोभा अंबेकर, सुनिता कदम, सुनिता वाघमारे, सुनंदा खरात यांची उपस्थिती होती.

-----------------------

जि.प. उच्च प्राथमिक शाळा, ढाकेफळ

जालना : ढाकेफळ येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शहादेव गाडगे यांनी मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी बाळू गाढवे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ब्रह्मदेव जगन्नाथ गोरे, भानुदास जगदाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अभिमन्यू गाढवे, अंगणवाडी कार्यकर्ते शिवकन्या चांदर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

---------------------------

श्री सरस्वती भूवन प्रशाला, जालना

जालना : येथील श्री सरस्वती भूवन प्रशाळेत मुख्याध्यापक मारूती पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उषा जाधव, सुलोचना वाघमारे, श्रुष्टी तौर, मालिका जोशी, संतोष जोशी, नीता दहिवाल, रत्नाकर लांडगे यांनी भाषण केले. याप्रसंगी जयमाला सिंदखेडकर, अनिता बनसोडे, के.डी. जोशी, व्ही.जी. माधवले, अनिता बनसोडे, एम.जी. पोलास, जे.एम. गायकवाड, विजया कुलकर्णी, मनीषा चव्हाण, वंदना जाधव, बिना पाठक, अंजली वणीकर, नीता दहीवाळ, चेतना भाले, सुलोचना वाघमारे, संगीता वाघमारे, सीमा पाटोळे, पर्यवेक्षक संतोष जोशी, रमाकांत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

प्राथमिक आरोग्य केंद्र, आव्हाना

आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका शांता मोरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आरोग्य सेवक विजय लकवाल, आरोग्य सेविका शांता मोरे, मंदा पांढरे, मलिका साळवे यांची उपस्थिती होती.

-------------------------------

अभिजीत विद्यालयात महिलांचा सत्कार

नेर : जालना तालुक्यातील अभिजीत विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिलांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक गजानन बुरूकुल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. वैभव, मौजपुरी पोलीस ठाण्याचे सय्यद मजीद, पांडुरंग चव्हाण, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, कोमल उबाळे, सुमया शेख, कांता सहाणे, निर्मला हिवाळे, लता उफाड आदींची उपस्थिती होती.

माहोरा येथे ठिकठिकाणी अभिवादन

माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक कृष्णा चेके यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षक सुधीर लकडे, ए.डी.पवार, सुखदेव अवकाळे, रामेश्वर खलसे, ज्येष्ठ शिक्षिका सुनीता बडगुजर, सुमिता महाळणकर, करूणा लोखंडे, गणेश पवार, शालेय समितीचे अध्यक्ष संतोष वरपे, उपाध्यक्ष सुखदेव खरसान, संतोष गौरकर, दादाराव गडकरी, संतोष बोर्डे, भानदास बोर्डे, जे.एम. सोनवणे, आर.एस. जाधव, राम शेळके, रमेश भालेकर आदींची उपस्थिती होती.

मत्स्योदरी महाविद्यालय, अंबड

अंबड : येथील मत्स्योदरी महाविद्यालयात प्राचार्य डॉ.शिवशंकर घुमरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. विनोद जाधव, डॉ. दिगंबर भुतेकर, प्रा. पी.टी. काळे, प्रा. दीपक राखुंडे, प्रा. रवींद्र पैठणे, प्रा. प्रकाश अकोलकर, अरुण लांडगे आदींची उपस्थिती होती.

हसनाबाद येथे ठिकठिकाणी अभिवादन

हसनाबाद : येथे ठिकठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक रामदास लेंबे, देवलाल आकोदे, सहशिक्षक दत्तात्रय वाडेकर, अंगणवाडी सेविका द्रोपदाबाई मानकापे, पोलीस निरीक्षक गुलाब पठाण, पोलीस कर्मचारी सुभाष चव्हाण, रामचंद्र कुदर, दीपक सोनवणे, अनिल डुरे यांची उपस्थिती होती. तर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी जेवरीकर, आरोग्य सेवक विष्णू तंगे, आरोग्य सेविका लता खेडकर, अनिल वाघमारे यांची उपस्थिती होती.

के.बी. प्रायमरी पब्लिक स्कूल, हसनाबाद

हसनाबाद : येथील के.बी. प्रायमरी पब्लिक स्कूलमध्ये संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बकाल यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी चंद्रकलाबाई बकाल, दिलीप जिवरग, सुरेखा बकाल यांची उपस्थिती होती. गजानन विद्यालयात आनंद इंगळे, विष्णू इंगळे, भानुदास देवरे, अभिषेक तंगे, आरव इंगळे यांची उपस्थिती होती.