शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जालना-जायकवाडी योजनेत अंबड कायमचे भागीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:27 IST

जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेत अंबड नगर पालिकेस कायमस्वरूपी भागीदार करण्याचा निर्णय झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आ. नारायण कुचे यांनी मंगळवारी पालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेत अंबड नगर पालिकेस कायमस्वरूपी भागीदार करण्याचा निर्णय झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आ. नारायण कुचे यांनी मंगळवारी पालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली. मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अप्पर सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे कुचे यांनी सांगितले.आ. कुचे म्हणाले की, हक्काच्या पाण्यासाठी अंबड नगरपालिकेला दरमहा १२ लाख रुपये खर्च करावे लागत असल्याने शहरवासियांना दरवर्षी १ कोटी ४४ लाख रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत होता. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे जायकवाडी-अंबड-जालना पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे नुकसान झाले. या बदल्यात जालना व अंबड नगरपालिकेस नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. नितीन गडकरी यांनी पाईपलाईनच्या नुकसान भरपाईपोटी १२ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या १२ कोटी ३५ लाख रुपयांपैकी जालना व अंबड नगरपालिकेला किती-किती निधी देण्यात यावा, याचा निर्णय घेण्यासाठी सोमवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. अंबड नगरपालिकेला जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेत कायमचा भागीदार करावे व अंबड शहराला दररोज ४ एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. परदेशी यांनी जालना नगरपालिकेने अंबड शहराला योजनेचे कायम भागीदार केल्याचे करारपत्र करावे व त्यानंतरच हा निधी जालना नगरपालिकेला वर्ग करावा, असा निर्णय बैठकीत जाहीर केल्याचे कुचे यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष केदार कुलकर्णी म्हणाले की, दररोज ४ एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पुढील पंधरा ते वीस वर्षे अंबड शहराला पाण्याची समस्या भेडसावणार नाही. यावेळी देविदास कुचे, शेखर मोहरीर, अरुण उपाध्ये, दीपकसिंग ठाकूर, मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, शहराध्यक्ष संदीप खरात, सभापती गंगाधर वराडे, सौरभ कुलकर्णी, खुर्शिद जिलाणी, अतुल अष्टपुत्रे, जाकेर डावरगावकर, संदीप आंधळे, प्रसाद झाडे, शकील शाह महंमद, नासेर मोहतरम आदींसह नगरसेवक, पदाधिकाºयांची उपस्थिती होती.