देळेगव्हाण येथे भाजपाचे चार प्रमुख नेते असून, त्यांच्यातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने एक पॅनल पूर्णपणे भाजपाचे असून, दुसऱ्या गटाने या पॅनलला हद्दपार करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीला सोबत घेऊन दंड थोपटले आहेत. बिनशर्त निवडणूक केली तर आमदार संतोष दानवे यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आवाहन मध्यंतरी भाजपाचे माजी तालुका अध्यक्षांनी केले होते; परंतु हे कुणालाही मान्य नसल्याने अनेक उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून नामांकनही दाखल केले आहे. देळेगव्हाण ग्रामपंचायतीची कार्यकारिणी ११ सदस्यांची आहे. यात भाजपाच्या एका गटाने ११ उमेदवार तर राष्ट्रवादी अधिक भाजप या गटाने १७ अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे होणारी निवडणूक कोणत्या वळणावर जाणार, हे वेळेच सांगेल; परंतु गावातील स्वच्छ पाण्याचा प्रश्न, सार्वजनिक स्वच्छतागृह, गावातील सांडपाण्याचा प्रश्न यांसह विविध विकासात्मक उपक्रम या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो.
देळेगव्हाणमध्ये ¦ग्रा. पं. चे राजकारण तापले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST