शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांची वाट १५ वर्षांनंतरही बिकटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:20 IST

परतूर येथील निम्न दुधना प्रकल्पात गेलेल्या पाच गावांना १५ वर्षानंतरही रस्ता नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर येथील निम्न दुधना प्रकल्पात गेलेल्या पाच गावांना १५ वर्षानंतरही रस्ता नाही. यामुळे नागरिकांना पावसाळ््यात चिखल व खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.परतूर व परिसरातील २१ गावे निम्न दुधना प्रकल्पात गेली आहेत. त्यानंतर या गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसित गावांमध्ये शासनाने भौतिक सुविधा पुरविल्या होत्या. परंतु, यातील रस्ते, नाल्या, शाळा, समाज मंदिर, वीज, पाणी पुरवठा योजना इ. कामे अर्धवटच आहेत. तर काही सुविधा धरणग्रस्त गावात येण्याआधीच गायब झाल्या. या कामांवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे ठेकेदारांनी ही कामे मर्जीप्रमाणे कामे केली. त्यामुळे गावांना आजही रस्त्याची प्रतीक्षा आहे.तालुक्यातील पाडळी, रोहिणा बू, एकरूखा, नागापूर, मापेगाव या पाच गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. या गावात थातूर- मातूर खडीकरण करून रस्ते तयार करण्यात आले. दर्जाहीन रस्ते केल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून, मोठ्या प्रमाणात चिखल जमा झाला आहे.ग्रामस्थांना चिखल तुडवत गावाबाहेर जावे लागते. गावातील नाल्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. तर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन कामे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षाcivic issueनागरी समस्या