भोकरदन : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. विनामास्क वाहने चालविणाऱ्या तब्बल ५४ वाहनचालकांवर सोमवारी नगरपालिका व भोकरदन पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे
भोकरदन तालुक्यातील जयदेववाडी गावात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे शहरातसुध्दा रुग्ण आढळून आले आहेत. तरीही नागरिक मास्क वापरत नाहीत. त्यामुळे सोमवारी सकाळी नगरपरिषद व पोलीस ठाण्याच्यावतीने संयुक्त करवाई मोहीम हाती घेण्यात आली. शहरातील बसस्थानक, परिसर व शिवाजी महाराज पुतळा परिसरात ही कारवाई करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार संतोष गोरड, गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक वामन आढे, पोलीस कर्मचारी बाबासाहेब काजळकर, गणेश पिंपळकर यांच्यासह नगर अभियंता किशोर ढेपले, विश्वजित गवते, दामोधर तायडे, बजरंग घुळेकर, दीपक सिंघल, गौवरधन सोनवणे, संध्या मापारी, मनीषा नरवाडे, शशिकांत सरकटे, अंबादास इंगळे, अक्षय पगारे, समी बेग, परसराम ढोके, संतोष राठोड, अजीम शेख, सोमनाथ बीरारे, कैलास जाधव आदींनी ५४ जणांवर कारवाई करून १० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला.
शहरासह तालुक्यात काेरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासकीय सूचनांचे पालन करावे. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझर, साबणाने हात धुणे हे नियम सर्वांनी पाळावेत.
अविनाश कोरडे
उपिवभागीय अधिकारी, भोकरदन
कारवाईसाठी पथके
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली, तरी नागरिक सूचनांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पथकेही कार्यरत राहणार आहेत.
संतोष गोरड, तहसीलदार, भोकरदन
कॅप्शन : भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तसीलदार संतोष गोरड, गटविकास अधिकारी राजपूत, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक वामन आढे व कर्मचारी, पोलीस.