शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, राष्ट्रवादीसाठी मित्रपक्षांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:44 IST

लोकसभा निवडणुकीतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रमुख उमेदवारांना लीड देण्यासाठी मित्रपक्ष भाजपा व काँग्रेसची प्रतिष्ठा परतूर विधानसभा मतदारसंघात पणाला लागली आहे

शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : लोकसभा निवडणुकीतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रमुख उमेदवारांना लीड देण्यासाठी मित्रपक्ष भाजपा व काँग्रेसची प्रतिष्ठा परतूर विधानसभा मतदारसंघात पणाला लागली आहे. यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रचारात रान उठविले आहे.लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला लीड देणारा विधानसभा मतदारसंघ म्हणून परतूरची ओळख आहे. या मतदारसंघात खरी लढत भाजपा आणि काँग्रेसमध्येच सुरु असते. मंठा नगरपंचायत शिवसेनेच्या तर परतूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री असून तेच परतूरचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने मित्र पक्षाला या निवडणुकीत लीड मिळवून देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. नगरपालिका निवडणुकीत बसलेल्या धक्क्यातून ते सावरले असून त्याची प्रचिती मताधिक्यातून त्यांना या निवडणुकीतून द्यावी लागणार आहे. तर काँग्रेसचे माजी आ.सुरेश जेथलिया यांनी नगरपालिका निवडणुकीत मिळविलेला विजय योगायोग नसून आजही आपली परतूरवर पकड कायम आहे, हे सिद्ध करण्याची जेथलिया यांना या माध्यमातून संधी आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्यासाठी बबनराव लोणीकर, राहुल लोणीकर तसेच सेनेचे ए.जे. बोराडे, माधवराव कदम, मोहन अग्रवाल, बाबासाहेब तेलगड, अशोक जाधव हे प्रचार यंत्रणा राबवित आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यासाठी काँग्रेसचे माजी आ.सुरेश जेथलिया, अनवर देशमुख, राजेश राठोड, राष्ट्रवादीचे कपील आकात, पंकज बोराडे, बळीराम कडपे, रमेश सोळंके यंत्रणा राबवित आहेत. तर दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही स्वपक्षाच्या उमेदवारास लीड देण्यासाठी झटत आहेत. वंचित आघाडीचे आलमगीर खान यांच्यासाठीही त्यांचे कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत.प्रचारात विकासाच्या मुद्यावर चर्चा होण्याऐवजी पाटील-देशमुख हाच मुद्दा उपस्थित केला जात आहे.मागच्या निवडणुकीत़़़२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बबनराव लोणीकर यांना ४६ हजार ९३७ तर काँग्रेसचे सुरेश जेथलिया ४२ हजार ५७७ मते मिळाली होती. लोणीकर यांनी जेथलिया यांचा ४ हजार ३६० मतांनी पराभव केला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाPoliticsराजकारण