शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

आजुबाईच्या स्वारीचा शनिवारी आन्वा येथे सोहळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:39 IST

भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून आन्वा येथील जगदंबा आजुबाईची स्वारी शुक्रवारी मध्यरात्री निघणार आहे.

हुसेन पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्कआन्वा : भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून आन्वा येथील जगदंबा आजुबाईची स्वारी शुक्रवारी मध्यरात्री निघणार आहे. मागील १५ वर्षापासून प. पू. सोनू महाराज स्वारी घेतात.या यात्रेला मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक आदी ठिकाणांहून भाविक स्वारीच्या दर्शनासाठी येतात. अष्टमीस सकाळी प. पू. सोनू महाराजांना मंत्र घोषात स्नान घातले जाते. नंतर महाराज देवीच्या ध्यानस्थ होतात. रात्री १२ वाजेच्या दरम्यान गावातील भगवतीची आज्ञा घेतात. गावातील मंदिर हे आजुबाई यांचे देवस्थान आहे. आज्ञा घेतल्यावर अपूर्व संचारात ते श्री आजुबाई देवीचे वस्त्र परिधान करतात. यानंतर देवीला आरसा दाखवून स्वरूप दर्शन घडविले जाते. व स्वारी निघते. दरम्यान गावातील मंदिरात भाविक पोता ऊजळतात. भक्तगण नवसाच्या पोता कबूल करून पोता खेळतात.दरम्यान पोतांचा प्रकाश पसरतो. वाद्यांचा गजर होतो. जनसमुदाय भक्तिभावात रंगून जातो. धर्म, वंश, वय, जात यांच्या पलीकडे गेलेले आजुबाईचे भक्त आजुबाईचा जयजयकार करतात. याच दरम्यान आजुबाईची स्वारी निघते. जयघोषाच्या निनादात स्वारी गावातील मंदिरात जाते. तेथे शस्त्रधारण विधी होतो. नंतर स्वारी शांत होते. प. पू. सोनू महाराजांचे आजुबाई स्वरूपातील दर्शन करून भक्तगण घराकडे जातात.स्वारीचीआख्यायिकाशके १४९४ चैत्र शु. चतुर्थीस श्री. क्षेत्र आन्वा येथे तुकारामपंत व चंद्रिकाबाई यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवती तुळजा भवानीने अवतार धारण केला. पाच वर्षाच्या अवतार कार्यात जगदंबा आजुबाईने राजापासून रंकापर्यंत अनेकांचे दु:ख निवारण केले. व दीन, पीडितांचा उद्धार करुन लोकांना भक्तीच्या मार्गास लावले. यामुळे जगदंबेची ख्याती सर्वदूर पसरुन भक्तांची रीघ लागली. भगवतीने तूकारामपंतांना पुत्र- प्राप्तीचे वरदान देऊन अंतर्धान होण्याचे ठरविले. त्यामुळे सर्वजण दु:खात बुडाले व जगदंबेच्या दर्शनास आपण अंतरणार हे सहन न होऊन ते भगवतीची प्रार्थना करू लागले की, माते तुझ्या दर्शनापासून आम्हास दूर नको ठेवू. तू आम्हास सोडून जाऊ नकोस. यावेळी आजुबाईने नागरिकांचे सांत्वन करताना सांगितले की, दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीस माझ्या वंशातील पुरुष माझी स्वारी घेईल व त्यावेळी मी त्यांच्याद्वारे सर्वांना दर्शन देईन. सर्वांच्या मनोकामना त्यातून पूर्ण होतील. असे अभिवचन देऊन भगवती आजुबाई अंतर्धान पावली. त्यानंतर तुकारामपंतांनी चैत्र शुद्ध अष्टमीस वस्त्र परिधान करून स्वारी घेतली व भगवतीने आपल्या वचनाप्रमाणे सर्वांना दर्शन दिले. तेव्हापासून आजपर्यंत श्री आजुबाई देवीची स्वारीची परंपरा वंश परंपरेने सुरू आहे. सध्या प. पू. श्री. सोनू महाराज २००४ पासून स्वारी घेत आहेत. या पूर्वी १९६२ पासून सदगुरू लक्ष्मीकांत महाराज स्वारी घेत असत. सदगुरू लक्ष्मीकांत हे ब्रह्मज्ञानी तपस्वी, आजन्म ब्रह्मचारी व संपूर्ण जीवन आजुबाई चरणी वाहिलेले परमपुरूष होते. त्यांचा शिष्यवर्ग महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही पसरलेला आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम