शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात नऊशे कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार ६८४ शेतक-यांना ९१० ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार ६८४ शेतक-यांना ९१० कोटी ३१ लाख रुपयांची कर्जमाफी दिल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरुवारी दिली.वर्षभरात सिद्धी २०१७, संकल्प २०१८ या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कामांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोकणी, उपजिल्हा निबंधक (सहकारी संस्था) आघाव, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी रवींद्र पडूळकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. दोन वर्षात अभियानांतर्गत ३९८ गावांची या अभियानात निवड करण्यात येऊन ३६९ गावे जलयुक्त करण्यात आली आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत परतूर तालुक्यातील  आष्टीसह १६ गावांचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे.परतूर तालुक्यातील आष्टीसह अकोली, आनंदगाव, ब्राह्मणवाडी, सुरुमगाव, ढोकमाळ तांडा, फुलेवाडी, पळशी, हास्तूरतांडा, लिखित पिंप्री, लोणी खुर्द, कनकवाडी, परतवाडी रायगव्हाण, सातारा वाहेगाव व वाहेगाव सातारा या गावांचा श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, जिल्हा माहिती अधिकारी एस. के. बावस्कर यांची या वेळी उपस्थिती होती.