शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कामांवर ८ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:02 IST

जालना : जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामांना आता मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. आज घडीला ४५५ कामांवर जवळपास आठ हजार ३२४ मजुरांची उपस्थिती असल्याचे सांगण्यात आले.ही कामे करताना कुशल आणि अकुशल अशी विभागनी करण्यात आली आहे. अकुशल कामांची संख्या ही १०८ असून, कुशल कामे सध्या सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले. सध्या ...

जालना : जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामांना आता मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. आज घडीला ४५५ कामांवर जवळपास आठ हजार ३२४ मजुरांची उपस्थिती असल्याचे सांगण्यात आले.ही कामे करताना कुशल आणि अकुशल अशी विभागनी करण्यात आली आहे. अकुशल कामांची संख्या ही १०८ असून, कुशल कामे सध्या सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले. सध्या शेतीमध्ये देखील हवी तेवढी कामे उपलब्ध नसल्याने अनेकांच्या हाताला कामाची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन रोजगार हमी विभागाने स्वंतत्र आराखडा तयार केला आहे.यात जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींपैकी केवळ १६३ ग्रामपंचपायतीतच ही कामे सुरू आहेत. यात तालुकानिहाय कामे आणि मजुरांची उपस्थिती अशी आहे. अंबड १२७ - (१७२७), बदनापूर ३४ - (५२६), भोकरदन ६९ - (१४९५), घनसावंगी ५६- (९९१), जाफराबाद २१-(२२९७), जालना ७९- (७३२), मंठा २२ - (१०९), आणि परतूर ४७ - (४७७) अशी आहे. कंसा बाहेरील आकडे त्या तालुक्यात सुरू असलेली कामे दर्शवितात तर कंसातील आकडे हे त्या कामांवर असलेल्या मजुरांची संख्या आहे.कडक उन्हातही कामसध्या जालना जिल्ह्यात उन्हाचा पारा हा ४० ते ४१ अंशावर पोहोचलेला आहे. असे असतानाही रोजगार हमी योजनेवरील मजूर हे पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हाची तमा बाळगत नसल्याचे दिसून आले. मजुरांना कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.प्रशासन : मजुरांची संख्या वाढल्यास नियोजन तयाररोजगार हमी योजनेच्या कामावर जिल्ह्यात आठ हजार मजूर सध्या कार्यरत आहेत. परंंतु भविष्यात आणखी मागणी वाढल्यास रोजगार हमी विभागाने त्याची पूर्ण तयारी केली आहे. कुशल तसेच अकुशल कामांचे नियोजन हे त्या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार ठरणार असल्याचे उपजिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाJalanaजालना