शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

६० धार्मिक स्थळे हटवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:01 IST

जालना : शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम गुुरुवारी चौथ्या दिवशीही सुरूच होती. आतापर्यंत ६० हून अधिक धार्मिक स्थळे ...

जालना : शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम गुुरुवारी चौथ्या दिवशीही सुरूच होती. आतापर्यंत ६० हून अधिक धार्मिक स्थळे हटविण्यात आली असून, धार्मिक स्थळांना लागून असलेली अवैध दुकानेही जमीनदोस्त करण्यात येत आहेत.गुरुवारी सकाळी भोकरदन नाका परिसरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाली. यामुळे जालना-औरंगाबाद रस्त्यावरील बसस्थानकाकडे जाणारी वाहतूक भोकरदन नाक्याहून संभाजीनगरमार्गे वळविण्यात आली होती. भोकरदन नाका परिसरातील दर्गा नसरुल्लाशाह कादरी परिसरातील काही कबरीही कारवाईत हटविण्यात आल्या. तसेच रस्त्यावर येत असलेली काही दुकानेही पाडण्यात आली. कारवाईच्या भीतीने काही नागरिकांनी रस्त्यावर येणारी आपली दुकाने स्वत:हून काढून घेतली. दुपारी दोन वाजेपर्यंत येथील कारवाई सुरू होती. मंठा चौफुली परिसरातील सात अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच अंबड चौफुली परिसरातील कल्पतरु अपार्टमेंट जवळील धार्मिक स्थळही हटविण्यात आले. गांधी चमन परिसरातील अतिक्रमणेही जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे कायम फळांच्या गाड्यांचा गराडा असलेला हा भाग मोकळा झाला आहे. धार्मिक स्थळांना लागून थाटण्यात आलेल्या टप-या, गॅरेज, ज्यूस, चहाविक्रीची दुकाने कारवाईत मोठ्या प्रमाणात हटविण्यात आली आहेत. आतापर्यंत एकूण ६० हून अधिक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, काही भागात अतिक्रमण हटविल्यानंतर काही नागरिक त्याच जागेवर दगडांच्या खुणा लावून पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याकडे अतिक्रमण हटाव पथकाने लक्ष देण्याची गरज आहे.