जालना : जुना जालन्यातील राजुरेश्वर कॉलनीत ५ मे रोजी झालेल्या ५६ हजार ५०० रुपयांच्या घरफोडीचा तपास तातडीने लागला असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून चोरीचा पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजुरेश्वर कॉलनीतील मुकेशकुमारसिंग कमलेश प्रकाशसिंग यांनी मंगळवारी रात्री ११.३० वाजता कदीम जालना पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून रोख ३२ हजार ५०० रुपये व दोन मोबाईल संच असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यात नमूद होते. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान, सहाय्यक पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या पथकातील कर्मचारी अजय फोके, लालासाहेब चव्हाण, मनोज काळे, नजीर पटेल, नितीन काकरवाल, मदन गायकवाड, कुटे, गोरखनाथ डिघोळे यांना खबऱ्याकडून वरील चोरीतील आरोपींची माहिती मिळाली. या पथकाने सापळा रचून योगेश शालीक मांगळे व गजानन विष्णू गवारे (रा. दोन्ही बुटेगाव, ता. बदनापूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी वरील चोरी उघडकीस आली. आरोपींच्या ताब्यातील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या आरोपींकडून आणखी चोरीची काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
५६ हजाराची घरफोडी उघडकीस
By admin | Updated: May 7, 2015 00:55 IST