शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

५४ उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 21:05 IST

नगरपालिका निवडणूक लढविणाºया ५४ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न करणे चांगलेच महागात पडले. नगरपालिका प्रशासनाने जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन येथील ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे.

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात खळबळ तीन वर्षांकरिता बंदी 

जालना : नगरपालिका निवडणूक लढविणाºया ५४ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न करणे चांगलेच महागात पडले. नगरपालिका प्रशासनाने जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन येथील ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. याबाबत गॅझेटमध्ये नोंद करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.जिल्ह्यात मागील वर्षी जालना, परतूर, अंबड व भोकरदन नगरपालिकेच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. नगरसेवक पदाचे स्वप्न पाहणाºया शेकडो उमेदवारांनी अर्ज भरले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला बँकेत स्वतंत्र खाते उघडून दररोज निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. असे असतानाही काही उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. अशा अनेक उमेदवारांना नगरपालिका प्रशासनामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर बहुतांश उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे खर्च सादर केला. मात्र, ५४ उमेदवारांनी वारंवार सूचना देऊनही निवडणूक खर्च सादर करण्यास टाळाटाळ केली. या सर्वांना नगरपालिका प्रशासनाने निवडणूक विभागाच्या नियमानुसार खर्च सादर न केल्यामुळे आपणास निवडणूक लढविण्यास अपात्र का ठरवू नये, या आशयाची नोटीस पाठवून आपली बाजू मांडण्यचे सांगण्यात आले होते. मात्र, संबंधित उमेदवारांनी याकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता कुठलीही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरिवण्यात आले आहे.एक विद्यमान नगरसेविकाअपात्र ठरविण्यात आलेल्या ५४  उमेदवारांव्यतिरिक्त जालना नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ३० मधील एका महिला नगरसेविकेनेही आपला निवडणूक खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे सदर नगरसेविकेला अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस नगरपालिका प्रशासनाने दिली आली आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांच्या दालनामध्ये मंगळवारी अंतीम सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.-----------नोटीस देऊनही बाजू मांडली नाहीनिवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक लढविणाºया प्रत्येक उमेदवाराला दररोज खर्च सादर करणे बंधनकारक आहे. पालिका निवडणुकीचा खर्च सादर न करणाºया ५४ उमेदवारांना प्रशासनाने नोटिसा दिल्या होत्या. नोटीस दिल्यानंतरही दिलेल्या वेळेत आपली बाजू न मांडणाºया उमेदवारांवर कारवाई करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. - शिवाजीराव जोधंळे, जिल्हाधिकारी, जालना.