शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

४४ कर्मचारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:41 IST

मंठा पंचायत समितीचा बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पंचनामा करण्यात आला. यावेळी एकूण ५५ कर्मचा-यांपैकी ४४ कर्मचारी गैरहजर आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्यालय असणाऱ्या मंठा पंचायत समितीचा बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पंचनामा करण्यात आला. यावेळी एकूण ५५ कर्मचा-यांपैकी ४४ कर्मचारी गैरहजर आढळून आले. यातील ७ कर्मचारी दौ-यावर असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात त्याची रजिस्टरमध्ये नोंद केली नसल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे पंचायत समिती कार्यलयाचा पंचनामा होण्याची ही चौथी वेळ असून, इथल्या भोंगळ कारभाराला अद्याप सुधारला नसल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.विविध शासकीय कामांसाठी तालुक्यातुन शेकडो नागरिक पंचायत समिती कार्यालयास भेट देतात. एकतर हे कार्यालय शहरापासून तीन किलोमीटर दूर असल्याने सर्वसामान्य लोकांना पायपीट करावी लागते. किंवा रिक्षाचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तालुक्यातील अनेक गावांत सध्या पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याने अनेक गावांचे सरपंच , सदस्य व नागरिक पंचायत समितीला कामानिमित्त भेटी देतात. कार्यालयात गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा कर्मचारी, बांधकाम व आस्थापना कर्मचारी, रोहयोसारख्या महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी नेहमी गैरहजर असतात.बुधवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी उपसभापती कल्याण खरात, दक्षता समितीचे अध्यक्ष अशोक वायाळ, पंजाब बोराडे , नागेश कुलकर्णी, सरपंच रामप्रसाद सुरनर, राम चव्हाण यांच्या उपस्थितीत कर्मचारी गैरहजर आढळल्याने कुलूप ठोकण्यात आले.यानंतर प्रभारी नायब तहसीलदार किशोर तायडे, तलाठी जी.आर. कुटे यांना बोलावून पंचासमक्ष कर्मचारी अनुपस्थित असल्याचा पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यामध्ये ४२ कर्मचा-यांपैकी ३४ कर्मचारी गैरहजर होते, तर १३ कंत्राटी कर्मचा-यांपैकी १० कर्मचारी गैरहजर होते. एकूण ५५ पैकी ४४ कर्मचारी गैरहजर आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या गैरहजर कर्मचा-यांवर काय कार्यवाही होते, याकडे मंठा वासियांचे लक्ष लागून आहे.विशेष म्हणजे यापुर्वी पंचायत समिती कार्यालयाचे तीन वेळा पंचनामे करण्यात आले. प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी गैरहजर आढळून येतात. याकडे वरिष्ठ अधिकारी वारंवार दुर्लक्ष करीत असल्यामुळे कर्मचारी आशा पंचनाम्यांना जुमानत नाहीत.पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या मतदार संघातील असलेल्या या पंचायत समिती कार्यालयाचा भोंगळ कारभार सुधारणार कधी तरी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिका-यांकडून गैरहजर कर्मचा-यांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष आहे.