शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयासह १४ व्या वित्त आयोगाच्या कामात ४१ लाखांचा अपहार

By दिपक ढोले  | Updated: August 31, 2022 13:55 IST

डोणगाव येथील तत्कालीन ग्रामसेवकासह सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल

जालना : शौचालयासह १४ व्या वित्त आयोगाच्या कामांमध्ये अनियमितता करून ४० लाख ९१ हजार ३३५ रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील तत्कालीन ग्रामसेवकासह सरपंचाविरुध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

तत्कालीन ग्रामसेवक प्रदीप अर्जून तांबिले व तत्कालीन सरपंच गंगाधर राधाकिसन खरात (रा. डोणगाव) यांनी संगणमत करून २०१२ ते २०२० या कालावधीत डोणगाव येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाची ३० लाख रूपयांची कामे केली. शिवाय, १४ व्या वित्त आयोगांतर्गत १० लाख ९१ हजार ३३५ रूपयांची कामे केली. ही कामे बोगस केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

या तक्रारीवरून सीईओंनी जाफराबाद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नारायण तुकाराम खिल्लारे (५४) यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांनी चौकशी करून सीईओंकडे अहवाल सादर केला. यात ४० लाख ९१ हजार ३३५ रूपयांचा अपहार झाल्याचे नमूद करण्यात आले. याप्रकरणी विस्तार अधिकारी नारायण खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन ग्रामसेवक  प्रदीप तांबिले, गंगाधार खरात यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :JalanaजालनाCorruptionभ्रष्टाचार