शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात पावणेचार लाखांवर युवा मतदारांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 18:55 IST

लोकसभा निवडणुकीनंतरही निवडणूक विभागाने जिल्ह्यात विशेष नाव नोंदणी मोहीम राबविली.

ठळक मुद्दे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाभरात १३ लाख ८९ हजार ३३ मतदार होते.

जालना : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात तब्बल ३ लाख ६६ हजार ४४५ युवा मतदारांची वाढ झाली आहे. यात २ लाख १४ हजार युवक तर १ लाख ५२ हजार युवतींचा समावेश आहे. तर नुकताच राबविण्यात आलेल्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत १८ हजार २१६ मतदारांची वाढ झाली आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी जोमात सुरू केली आहे. आजी-माजी मुख्यमंत्री संघटना बांधणीसाठी गावोगाव फिरत आहेत. सत्ताधारी विकास कामांचे ढोल वाजवित असून, विरोधक त्यांच्या चुकांवर बोट ठेवत समस्यांचा पाढा वाचत आहेत. मात्र, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाने मात्र, आपले मतदार नोंदणीचे काम अखंडपणे सुरू ठेवले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाभरात १३ लाख ८९ हजार ३३ मतदार होते. निवडणूक विभागाने राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत गत लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांची संख्या १५ लाख १६ हजार ४३१ वर गेली होती. यात ७ लाख ९८ हजार ७५० पुरूष तर ७ लाख १७ हजार ६८१ महिला मतदारांचा समावेश होता.

लोकसभा निवडणुकीनंतरही निवडणूक विभागाने जिल्ह्यात विशेष नाव नोंदणी मोहीम राबविली. दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नाव नोंदणीसाठी १९ हजार ६१० जणांचे अर्ज दाखल झाले होते. यात ९६१६ युवक व ९९९४ युवतींचे अर्ज आले होते. छाननीनंतर १२९४ अर्ज वगळण्यात आले. तर १८ हजार ३१६ मतदारांची नोंद झाली. यात ८ हजार ८९८ युवक तर ९ हजार ४१७ युवतींचा समावेश आहे. गत पाच वर्षात १८ ते २९ वर्षे वयोगटातील तब्बल तब्बल ३ लाख ६६ हजार ४४५ युवा मतदारांची वाढ झाली आहे. यात २ लाख १४ हजार युवक तर १ लाख ५२ हजार युवतींचा समावेश आहे. १८ व १९ वर्षे वयोगटातील ३४ हजार ४०१ तर २० ते २९ वर्षे वयोगटातील १ लाख ३९ हजार ९५१ मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण १५ लाख ५२ हजार ५९९ मतदार असून, यात ८ लाख १६ हजार २३२ पुरूष तर ७ लाख ३६ हजार ३६५ महिला मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, दुष्काळ, वाढती बेरोजगारी, उद्योग, शैक्षणिक सुविधा, आरोग्य यासह इतर योजनांची अंमलबजावणी, युवकांसमोरील प्रश्न आणि शासनाबाबत युवकांची भूमिका आगामी निवडणुकीत मतदानाच्या स्वरूपातून समोर येणार आहे. त्यामुळे युवकांची अधिकाधिक मते आपल्याच पारड्यात पडावीत, यासाठीही राजकीय पक्ष विशेष लक्ष देत आहेत.

८० वर्षावरील ५४ हजार मतदार : मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर

जिल्ह्यात ८० वर्षावरील ५४ हजार २०५ मतदार आहेत. यात ८० ते ८९ वयोगटात ४४ हजार ७८, ९० ते ९९ वर्ष वयोगटात ८ हजार ६१८ तर ९९ वर्षाच्या वर वय असलेले ९१८ वयोवृध्द मतदारांचा समावेश आहे. या मतदारांनीही मतदान करावे, यासाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे.लवकरच मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर राबविले जाणार आहे. या शिबिरातूनही काही युवक, युवतींची नावे मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाधिक युवक, युवतींनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आता लागणार ‘ओटीपी’यापूर्वी निवडणूक विभागाच्या वेबसाईटवरील सहा नंबरचा अर्ज कोठेही भरता येत होता. अर्ज भरून युवा मतदारांना नाव नोंदणी करता येत होती. मात्र, आता या प्रक्रियेत बदल करण्यात आले असून, युवक आपल्या मोबाईलवरूनही नाव नोंदणी करू शकणार आहेत. मोबाईल क्रमांक आणि त्यावर येणारा ‘ओटीपी’ टाकल्याशिवाय नाव नोंदणीचा आॅनलाईन अर्ज उघडणार नाही, हे विशेष!

टॅग्स :JalanaजालनाVotingमतदानJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना