शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात जलयुक्तची २७० कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 18:49 IST

जालना जिल्ह्यातील सर्वच कामे राजकीय पक्षांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी केली असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.

ठळक मुद्देसर्वपक्षीय नेत्यांशी कंत्राटदारांचे संबंध

जालना : जिल्ह्यात युती सरकारच्या काळात पाणीटंचाई दूर करण्यासाठी जवळपास ७८२ कामे करण्यात आली असून, त्यावर २७० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. राज्यातील जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशी केली जाणार असल्याची घोषणा राज्य शासनाने केली असताना जालना जिल्ह्यातील कामांची चौकशी सध्या सुरू करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

जालना जिल्ह्यातील सर्वच कामे राजकीय पक्षांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी केली असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.  त्यामुळे चौकशीला विलंब होत असल्याची चर्चा सुरू आहे. जालना जिल्हा पूर्वीपासूनच दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील सिंचन क्षमता ही अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. ती वाढावी म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविली होती. त्यात २०१५ ते २०१९ या काळात २७० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. अनेक ठिकाणी कामे ही निकष डावलून झाली आहेत; परंतु त्यांची चौकशी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही कामे करताना चार वर्षांत अनेक नवनवीन निकष पाळण्यासंदर्भात शासन निर्णय निघाले. त्यामुळे ही कामे करताना अधिकारी आणि कंत्राटदार चक्रावून गेले होते. अनेकांनी कामे पूर्ण केल्यावर ती नवीन निकषाप्रमाणे झाली नसल्याचे दिसून आले. आज या जलयुक्त शिवार योजनेतले ७८३ गावांमध्ये १३ हजार ६५० गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली आहेत. 

सर्वपक्षीय नेत्यांशी कंत्राटदारांचे संबंधजलयुक्त शिवाराची कामे करताना तांत्रिक निकष डावलून कामे केली आहेत. या कामांची कोट्यावधी रुपयांची बिले ही उचलण्यात आली. या कामांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांशी संबंधित कंत्राटदारांचा समावेश असल्यामुळे चाैकशी करण्याची मागणी एकाही पक्षाने केलेली नाही. यात भाजप, शिवसेना, तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित कंत्राटदारांनी  समावेश असल्याचेही यादीवरून दिसून येते. 

टॅग्स :JalanaजालनाJalyukt Shivarजलयुक्त शिवार