शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१६० बसेस ‘कोरोना फ्री’; प्रवासी मात्र बेफिकीर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:36 IST

जालना : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या जालना ...

जालना : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या जालना आगाराने जिल्ह्यातील तब्बल १६० बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले आहे. त्यामुळे या बसेस कोरोना फ्री झाल्या आहेत. मात्र, असे असले तरी बसमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी प्रशासकीय सूचनांचे उल्लंघन करत बेफिकीरपणे प्रवास करत आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव झाला आणि शहरी, ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली बससेवा बंद करण्यात आली. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली असली, तरी अनेक मार्गांवरील बसेस अद्यापही बंद आहेत. काही बसेस सुरू झाल्या आहेत, या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध मार्गांवर असलेल्या जिल्ह्यातील १६० बसेसचे कोटिंग पूर्ण झाले आहे.

एका एस. टी.ला वर्षातून चारवेळा होणार कोटिंग

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जालना जिल्ह्यातील बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. किमान तीन महिन्यांनी हे कोटिंग होणे गरजेचे आहे. त्यानुसार जालना विभागीय महामंडळाकडून कोटिंगचे नियोजन केले जात आहेत.

एका बसचे ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्यासाठी जवळपास सात हजार रूपयांचा खर्च आला आहे. सद्यस्थितीत वर्षातून दोनवेळा बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या सूचनेनुसार, पुढील कोटिंगबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या या निर्णयामुळे मात्र प्रवाशांना कोरोनापासून दूर ठेवण्यास मदत होणार आहे.

बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही, पण बाजूलाच बसला असल्यास

एखाद्या बाधित व्यक्तीने बसप्रवास केला तरी इतर प्रवाशांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण ॲन्टिमायक्रोबियल कोटिंगमुळे कमी होते.

बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले असले, तरी बसद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क वापरासह इतर प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.

प्रवासी म्हणतात

आम्ही बसद्वारे नियमित प्रवास करतो. परंतु, कोरोनामुळे बस बंद झाल्या होत्या. त्यावेळी अनेक अडचणी आल्या. आता बसेस पूर्ववत होत आहेत. त्यात बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले जात असल्याने प्रवास सुरक्षित होणार आहे.

- रामेश्वर शिंदे

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अनेकजण बसने प्रवास करण्यास नकार देत होते. परंतु, आता महामंडळाने बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित झाला आहे.

- सुनील म्हस्के

आगार व्यवस्थापक म्हणतात...

कोरोनाचा संसर्ग रोखणे आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्यात आले आहे. असे असले तरी प्रवाशांनी बसने प्रवास करताना शासकीय सूचनांचे पालन करावे.

- प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक