शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नऊ डॉक्टरांसह १२ जण रडारवर, अवैध गर्भलिंग निदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 10:19 IST

पकडलेल्या नाना सहाणे आणि बुलडाण्यातील डॉ. विजय प्रभाकर सोळुंके याला न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

भोकरदन (जि. जालना) : अवैध गर्भलिंगनिदान, गर्भपात प्रकरणात जालना एलसीबीने केलेल्या तपासात आता जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाण्यातील नऊ डॉक्टरांसह १२ जणांना नव्याने आरोपी करण्यात आले आहे. पकडलेल्या नाना सहाणे आणि बुलडाण्यातील डॉ. विजय प्रभाकर सोळुंके याला न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

जुलै २०२४ मध्ये भोकरदन येथील अवैध गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश झाला होता. त्या प्रकरणात १५ जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यातील १४ जणांना आजवर अटक करण्यात आली आहे. विशेषत: नाना सहाणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर तो १२ जानेवारी रोजी पोलिसांना शरण आला होता. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बुलडाण्यातील अवैध गर्भपात करणाऱ्या डॉ. विजय सोळुंके याचे नाव समोर आले.

एकूण २७ आरोपीअवैध गर्भपात प्रकरणात प्रारंभी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांच्या तपासात आता नव्याने १२ जणांची नावे समोर आली असून, त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता २७ आरोपी झाले आहेत.

नऊ डॉक्टरांसह १२ जणतब्बल नऊ डॉक्टरांसह इतर कर्मचारी अशी १२ जणांची नावे समोर आली आहेत. त्यात डॉ. राजेंद्र ऊर्फ राज काशीनाथ सावंत (रा.जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर), डॉ. मोहिनी विजय सोळंकी (रा. सोळंकी हॉस्पिटल, बुलडाणा), डॉ. प्रमिला सोळंकी (रा. रविदीप हॉस्पिटल, बुलडाणा), डॉ. सुलक्षणा अग्रवाल (रा. अग्रवाल हॉस्पिटल, चिखली जि. बुलडाणा), डाॅ. संगीता देशमुख देऊळघाट, डाॅ. दीपिका थत्ते (थत्ते हॉस्पिटल गांधीचमन, जालना), डॉ. सुनीता सुभाष सावंत (सावंत हॉस्पिटल भोकरदन), डॉ. रवी वाघ (रा. रविदीप हॉस्पिटल, भोकरदन), साकोळकर हॉस्पिटलमधील डॉक्टर (रा. छत्रपती संभाजीनगर), मीरा सिस्टर (जालना), जायदा बेगम (रा. छत्रपती संभाजीनगर), सुधाकर हिवाळे (रा. भोकरदन) या १२ जणांची नावे समोर आली असून, त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. संबंधितांचाही शोध सुरू असल्याचे तपासाधिकारी सपोनि. योगेश उबाळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालना