शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

११ कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवा- लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:26 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून याचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश देत कामात हयगय अथवा कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून याचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश देत कामात हयगय अथवा कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचेपाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.परतूर येथील पंचायत समिती सभागृहात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा ११ कलमी कार्यक्रमाचा आढावा पालकमंत्री लोणीकर यांनी घेतला. यात पाणंद रस्ते, नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, ब्रिजेश पाटील, सुदाम प्रधान, मदनलाल शिंगी, पंजाबराव बोराडे, गणेशवराव खवणे, रमेश भापकर, मधुकर खंदारे, पाईकराव, विष्णू फुफाटे, अशोक डोके, किशोर हनवते आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा ११ कलमी कार्यक्रम राबविण्यात येतो. या ११ कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याबाबत यापूर्वीच पदाधिकारी, अधिका-यांच्या कार्यशाळा, बैठका घेण्यात आल्या होत्या. परंतू पाहिजे त्या प्रमाणात या कामामध्ये प्रगती नसल्याची खंत व्यक्त करत हा ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा. या कामात हयगय अथवा दिरंगाई करणा-या अधिकारी, कर्मचाºयांची हयगय केली जाणार नसून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.जालना जिल्ह्यात चार हजार ५०० सिंचन विहिरी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते व त्या जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. परंतु हे कामही अत्यंत संथगतीने करण्यात येत आहे. परतूर तालुक्यात दोन हजार २०० विहिरींच्या कामांना जिल्हा परिषदेने स्थगिती दिली होती. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून ज्या त्रुटींमुळे ही स्थगीती देण्यात आली होती. त्या त्रुटींची पूर्तता करून येत्या १५ दिवसांच्या आत सिंचन विहिरींची सर्व कामे सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.नानाजी कृषी देशमुख संजीवनी योजनेत जिल्ह्यातील ३६३ गावांची निवड करण्यात आली असून, या योजनेची कामेही तातडीने सुरु करण्याच्या सुचना देत पालकमंत्री लोणीकर यांनी अहिल्यादेवी सिंचन विहिर, अमृतकुंड शेततळे, भू-संजिवनी, भू-संजीवनी कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव तलाव, अंकुर रोपवाटीका, नंदन वन वृक्ष लागवड, समृद्ध ग्राम योजना या योजनांचा तालुकानिहाय तहसिलदार, गटविकास अधिकारी व उपविभागीय अधिका-यांनी आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरgovernment schemeसरकारी योजना