शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

यूट्यूब प्रसन्न... आठ वर्षांची मुलगी कमवते महिन्याला ८० लाख

By admin | Updated: April 20, 2015 13:18 IST

सिडनीत राहणा-या मिनी मार्था स्टिव्हर्ट या आठ वर्षाच्या चिमूरडीने यूट्यूबवर पाककृतीच्या चॅनेलच्या माध्यमातून महिन्याला लाखोंची कमाई केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
सिडनी, दि. २० - वय वर्ष अवघे आठ.... छंद घरात पाककृती करुन त्याचा व्हिडीओ यूट्यूबवर टाकणे... महिन्याची कमाई १ लाख २७ हजार डॉलर्स (भारतीय चलनानुसार ८० लाख रुपये).. ऑस्ट्रेलियात राहणा-या मिनी मार्था स्टिव्हर्ट उर्फ चार्ली या चिमुकलीची ही कमाई सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. 
मिनी मार्था स्टिव्हर्ट ही चिमुरडी यूट्यूबवर फूड चॅनल चालवते. यूट्यूबवर मिनी मार्था ही चार्ली या नावाने प्रसिद्ध असून चार्लीज क्राफ्टी किचन हे तिच्या यूट्यबू चॅनलचे नाव आहे. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार फूड कॅटेगरीत चार्लीचे चॅनेल हे सर्वात लोकप्रिय असून या चॅनलच्या माध्यमातून तिची महिन्याला तब्बल १ लाख २७ हजार डॉलर्सची कमाई होते. यूट्यूबवर फूड कॅटेगरीत पाककृतीचे चॅनल चालवणा-या अन्य ख्यातनाम शेफवरही चार्लीने मात केली आहे. यूट्यूबवर सेलिब्रीटी शेफ जॅमी ऑलिव्हबर यांची महिन्याची कमाई ३२ हजार डॉलर्स ऐवढीच आहे. 
चार्ली व्हिडीओच्या माध्यमातून केक, पेस्ट्री बनवण्याच्या सोप्या पद्धती लोकांना सांगते. तिच्या या व्हिडीओजना दररोज सुमारे २९ मिलीयन लोकं बघत असल्याने या चॅनलवर जाहित देणा-यांची संख्याही जास्त आहे. हे जाहिरातदार यूट्यूबला पैसे देतात व यूट्यूब त्यातील वाटा चार्लीला देतात. 
मिनी मार्था ६ वर्षांची असल्यापासून तिला पाककलेची आवड आहे. मुलीची ही आवड बघून तिच्या आईने यूट्यूबवर चार्लीज क्राफ्टी किचन या नावाने चॅनेल सुरु केले. मिनी मार्थाने बनवलेल्या पदार्थांची चव तिची लहान बहिण अ‍ॅश्ले चाखून बघते व तो पदार्थ चांगला झाला की नाही हे सांगते. अवघ्या दोन वर्षांत हे चॅनल चांगलेच लोकप्रिय झाले व मिनी मार्थाच्या कमाईचा आकडाही वाढला.