शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तरुण नाही तरुणींनी मिळून केला सामूहिक बलात्कार

By admin | Updated: May 30, 2017 11:03 IST

तरुणींनी सलग तीन दिवस तरुणाला बंदी ठेवत त्याच्यावर बलात्कार केला

ऑनलाइन लोकमत
जोहान्सबर्ग, दि. 30 - दक्षिण अफ्रिकेत तीन तरुणींनी मिळून एका 23 वर्षीय तरुणावर सामूहिक बलात्कार केला आहे. तरुणींनी सर्वात आधी तरुणाला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. तरुण बेशुद्ध झाल्यानंतर त्याचं अपहरण करण्यात आलं. तरुणींनी सलग तीन दिवस तरुणाला बंदी ठेवत त्याच्यावर बलात्कार केला. बलात्कार पीडित तरुण अद्यापही घाबरलेला आहे. दक्षिण अफ्रिकेत पुरुषांवर बलात्कार होणं तसं काही नवीन नाही. वारंवार अशा घटना समोर येत असतात. आकडेवारीनुसार बलात्कारांपैकी 20 टक्के प्रकरणांमध्ये पुरुष पीडित असतात. 
 
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुण शुक्रवारी शेअर टॅक्सीतून प्रवास करत होता. यावेळी टॅक्सीत अगोदरच तीन तरुणी होत्या. तरुण जेव्हा टॅक्सीत बसला तेव्हा काही वेळाने टॅक्सीने आपला मार्ग बदलला. तरुणींनी तरुणाला ड्रायव्हरच्या सीटशेजारी बसण्यास सांगितलं. तरुण पुढे जाऊन बसला असता त्यांनी चालाखीने त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. तरुणाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तो एका अनोळख्या खोलीत होता. 
 
पीडित तरुणाने आरोप केला आहे की, तिनही तरुणींनी त्याला जबरदस्तीने एनर्जी ड्रिंक पाजलं, आणि त्यानंतर आळीपाळीने बलात्कार केला. तीन दिवसांनंतर तरुणींनी तरुणाला अर्धनग्न अवस्थेत एका मैदानात सोडलं. तरुणाची परिस्थिती अत्यंत खराब होती. तिथून जात असलेल्या एका कारच्या मदतीने तो रुग्णालयात पोहोचला. 
 
"अन्याय कोणाविरोधातही झाला असला तरी अशा प्रकारच्या लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्याला गंभीरतेने घेण्याची गरज असल्याचं", पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. आरोपींना शिक्षा देत न्याय मिळवून देऊ असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. 
 
दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेत पुरुष आणि महिलांवर होणा-या लैंगिक अत्याचारांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. आकडेवारीनुसार दरवर्षी बलात्काराच्या पाच लाख घटना समोर येतात. यामधील 20 टक्के पीडित पुरुष असतात. पोलीस प्रकरण गंभीरतेने घेत नसल्याने अनेकदा पुरुष पीडित पोलिसांकडे तक्रार करत नाहीत.