शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

होय, भारतात हल्ले केले

By admin | Updated: July 4, 2017 01:23 IST

हिजबुल मुजाहिदीनने भारतात दहशतवादी हल्ले केल्याची कबुली देत हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सईद सलाहुद्दीनने स्वत:हून

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : हिजबुल मुजाहिदीनने भारतात दहशतवादी हल्ले केल्याची कबुली देत हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सईद सलाहुद्दीनने स्वत:हून आपण दहशतवादी असल्याचे सिद्ध केले आहे. अमेरिकेने अलीकडेच त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले असून, अमेरिकेची ही कारवाई उचित असल्याचे त्याच्या कबुलीवरून स्पष्ट होते. सोबतच पाकिस्तानच्या भूमीचा भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी वापर होतो, या भारताच्या दाव्यालाही पुष्टी मिळते.जिओ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सलाहुद्दीनने मेखी मिरवत भारतातील दहशतवादी कारवायांची कबुली दिली. आमचे लक्ष भारतीय सुरक्षा दलांवर आहे. आम्ही ज्या कारवाया केल्या-करणार आहोत, त्या सर्व भारतीय सुरक्षा दलावर केंद्रित आहेते. हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या असलेल्या सलाहुद्दीन याने मागच्या वर्षी धमकीही दिली होती की, भारतीय सुरक्षा दलांसाठी काश्मीर खोऱ्याला स्मशान बनवू. काश्मीर आपले घर आहे. बुऱ्हान वनी मारला गेल्यापासून काश्मीर खोऱ्यात बंडखोरी वाढली आहे. भारतात आमचे अनेक समर्थक आहेत. आम्ही भारतात कुठेही हल्ले करू शकतो, असे सांगत त्याने विदेशातून शस्त्रास्त्र खरेदीचीही कबुली दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तो ठाण मांडून आहे. कारवाई अनुचितजागतिक दहशतवादी घोषित करण्याची अमेरिकेची कारवाई पूर्णत: अनुचित आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेडसर आहेत. त्यांचे प्रशासनही वेडपट आहे. भारताला बक्षिसी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. तथापि, आमचा आत्मविश्वास डगमणार नाही, अशी दर्पोक्तीही त्याने केली. शिक्का स्वत:च सार्थ ठरविलाभारतात याआधी अनेक दहशतवादी कृत्ये केल्याची कबुली देऊन सैयद सलाहउद्दीन याने त्याच्यावर अमेरिकेने ‘जागतिक दहशतवादी’ असा मारलेला शिक्का स्वत:च सार्थक ठरविला आहे, अशी प्रतिक्रिया भारताने दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अशोक प्रसाद म्हणाले की, भारतातील दहशतवादी कारवायांना आणि त्या घडवून आणणाऱ्यांना सलाहउद्दीनकडून वित्तीय तसेच अन्य प्रकारची मदत मिळते, हे आम्ही पूर्वीपासूनच सांगत आलो आहोत. आता त्याने स्वत:च कबुली देऊन आपले खरे रूप प्रकट केले आहे.