शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

येमेनचे अध्यक्ष हादी यांना सौदीचा आश्रय

By admin | Updated: March 28, 2015 00:03 IST

युद्धग्रस्त येमेनचे अध्यक्ष अब्राबुह मन्सूर हादी हे सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे आज आले असून, बुधवारी ते गायब झाल्यानंतर प्रथमच त्यांचा थांगपत्ता लागला आहे.

सना : युद्धग्रस्त येमेनचे अध्यक्ष अब्राबुह मन्सूर हादी हे सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे आज आले असून, बुधवारी ते गायब झाल्यानंतर प्रथमच त्यांचा थांगपत्ता लागला आहे. दरम्यान, सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली येमेनमध्ये सुरू असलेल्या हवाई हल्ल्याला आता २४ तास उलटले असून या कालावधीत ३९ नागरिक ठार झाले आहेत. बुधवारी एडन शहरावर बंडखोरांनी हल्ला केल्यानंतर तेथून हादी पळाले होते. त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यानंतर प्रथमच आज त्यांचा पत्ता कळाला आहे. ते इजिप्तला अरब लीगच्या परिषदेसाठी जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, येमेनमध्ये सौदी अरेबियासह १० राष्ट्रांची चढाई चालूच असून, सना येथील लष्करी तळावर टाकलेल्या छाप्यात बाजूचे रहिवासीही ठार झाले आहेत. या ठिकाणी १२ जण मरण पावले. सनाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या अध्यक्षीय प्रासादाच्या परिसरात तीन वेळा हवाई हल्ले झाले. एडनच्या हवाई तळावरही धुमश्चक्री चालू असून तेथेही नागरिक मारले गेल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)४अध्यक्ष हादी यांनी सनाहून पलायन केल्यानंतर एडन येथे आश्रय घेतला होता. बंडखोरांनी जानेवारी महिन्यात सना ताब्यात घेतले होते व हादी यांना घरीच स्थानबद्ध केले होते. एडनमधून बुधवारी पळाल्यानंतर शुक्रवारी ते रियाध येथे पोहोचले आहेत. सौदी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार येमेनचे अध्यक्ष म्हणून हादी इजिप्तला अरब परिषदेस उपस्थित राहणार आहेत. ४सौदी अरेबियाचे अमेरिकेतील राजदूत अब्देल अल जुबैर यांनी दिलेल्या माहितीनुसार हवाई हल्ल्याची पहिली फेरी यशस्वीपणे पार पडली आहे. हौथी बंडखोराविरोधातील मोहिमेची ही सुरुवात आहे. बंडखोरांना लवकरच सुबुद्धी सुचेल असे अपेक्षित आहे, असेही जुबैर म्हणाले.