शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शी जिनपिंग चीनचे तहहयात ‘बादशाह’, निरंकुश सत्तेसाठी बदलली राज्यघटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 03:04 IST

चीन या जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या आणि अफाट लष्करी व आर्थिक ताकद असलेल्या देशाने रविवारी शी जिनपिंग यांच्या हाती निरंकुश सत्ता बहाल केली.

बीजिंग - चीन या जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या आणि अफाट लष्करी व आर्थिक ताकद असलेल्या देशाने रविवारी शी जिनपिंग यांच्या हाती निरंकुश सत्ता बहाल केली.शी यांना इच्छा असेल तोपर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहता यावे यासाठी चीनच्या संसदेने देशाची राज्यघटना जवळजवळ एकमताने बदलली. चीन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस हे सर्वोच्च पद शी यांच्याकडे आहेच व त्यालाही कोणतीही कालमर्यादा नाही. अशा प्रकारे शी हेमाओ यांच्या तोडीचे प्रबळ नेते झाले आहेत. (वृत्तसंस्था)सर्वेसर्वा : पक्ष, सरकार आणि सैन्यदले या सर्वांची सत्ता ६४ वर्षांच्या शी यांच्या हाती एकवटली आहे. यापूर्वी माओ व डेंग शियाओ पिंग हे चीनचे सर्वशक्तिमान नेते म्हणून ओळखले गेले. परंतु त्यांच्या सत्तेलाही राज्यघटनेचे कमाल १० वर्षांचे बंधन होते.घटनेत नेमका काय बदल?चीनच्या राज्यघटनेत राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष यांच्या पदांना प्रत्येकी पाच वर्षांच्या सलग दोन कालावधींची कमाल मर्यादा होती. शी यांची सध्या या पदावरील दुसरी ‘टर्म’ सुरु आहे.त्यानंतरही त्यांना पदावर राहता यावे यासाठी राज्यघटनेतील ही कमाल मर्यादा काढून टाकण्याचा प्रस्ताव कम्युनिस्ट पक्षाने केला. राष्ट्रीय पीपल्स काँग्रेस या चीनच्या संसदेने तो २,९७३ वि. २ अशा बहुमताने मंजूर केला. तिघांनी मतदानात भाग घेतला नाही.

टॅग्स :chinaचीनPresidentराष्ट्राध्यक्ष