शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यास पत्र लिहा!

By admin | Updated: May 29, 2017 01:07 IST

निरपराधांचे बळी घेण्यामागे दहशतवाद्यांचा काय हेतू असतो हे समजण्यास मदत व्हावी म्हणून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून

लंडन : निरपराधांचे बळी घेण्यामागे दहशतवाद्यांचा काय हेतू असतो हे समजण्यास मदत व्हावी म्हणून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून, त्यांच्या शालेय अभ्यासाचा एक भाग म्हणून, ‘दहशतवाद्यास पत्र’ लिहून घ्यावे, अशी सूचना ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या पुस्तकात शिक्षकांना करण्यात आली आहे.‘टॉकिंग अबाऊट टेररिझम’ असे या पुस्तकाचे नाव असून, गेल्या आठवड्यात मँचेस्टरमध्ये दहशतवादी हल्ला होण्यापूर्वी ते प्रसिद्ध झाले आहे. ‘डेली एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने ही बातमी देताना म्हटले की, दहशतवाद्यांकडून निरपराधांचे हकनाक घेतले जाणारे बळी हेही ‘एक प्रकारचे युद्ध’ असल्याचे प्रतिपादन या पुस्तकात करण्यात आले असून, आपल्याला सन्मानाने वागणूक मिळत नसल्याच्या भावनेतून दहशतवादी लोकांना ठार करीत असतात, अशी कारणमीमांसा त्यात देण्यात आली आहे.७ ते ११ या वयोगटातील प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून, शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून, दहशतवाद्यास उद्देशून पत्र लिहून घ्यावे व प्रत्यक्षात एखाद्या दहशतवाद्यास प्रश्न विचारण्याची संधी मिळालीच, तर त्यांना कोणते सहा प्रश्न विचाराल, हेही विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगावे, अशी आग्रही शिफारस या पुस्तकात शिक्षकांना करण्यात आली आहे.‘ब्रिलियंट पब्लिकेशन्स’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकास पीटर वॅनलेस यांची प्रस्तावना आहे. बालहक्क संरक्षणासाठी काम करणाऱ्या ‘नॅशनल सोसायटी फॉर प्रिव्हेंशन आॅफ क्रुएल्टी टु चिड्रेन’ या संस्थेचे ते सीईओ आहेत. (वृत्तसंस्था)शिक्षणतज्ज्ञांकडून टीकाशिक्षणतज्ज्ञांनी एवढ्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचा अभ्यास करून घेणे धोकादायक असल्याचे नमूद करून त्यावर टीका केली आहे. यासंदर्भात ‘कॅम्पेन फआॅर रिअल एज्युकेशन’चे अध्यक्ष क्रिस मॅक्नव्हर्न म्हणाले की, जे दहशतवादी कोणताही विधिनिषेध न बाळगता कोणालाही ठार करायला कमी करीत नाहीत, त्यांच्याकडेही आदराने पाहून त्यांचे मन जाणून घेण्याची ही कल्पना वेडगळपणाची आहे. काल्पनिक संवादाने दहशतवादाचे मानवीकरण करण्याची प्राथमिक इयत्तांचे शालेय वर्ग ही जागा नाही. दहशतवाद्यांचे हेतू जाणून घेण्याच्या बहाण्याने हे पुस्तक त्यांच्याविषयी कणव दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे.