शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचं 116व्या वर्षी निधन

By admin | Updated: May 13, 2016 21:18 IST

जगातली सर्वात वयोवृद्ध महिला सुशन्ना मुशत्ता जोन्स यांचं 116व्या वर्षी निधन झालं

 ऑनलाइन लोकमत

न्यूयॉर्क, दि. 13- जगातली सर्वात वयोवृद्ध महिला सुशन्ना मुशत्ता जोन्स यांचं 116व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदही झाली आहे. ब्रुकलीनमध्ये वयोवृद्धांना राहण्यासाठी केलेल्या वृद्धाश्रमातच 12 मेच्या रात्री जोन्स यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या 10 दिवसांपासून जोन्स आजारी होत्या, अशी माहिती वार्धक्य शास्त्राच्या रिसर्च ग्रुपचे रॉबर्ट यंग यांनी दिली. 
अल्बामातल्या मेंटागोमेरीमधल्या छोट्याश्या खेडेगावात 1899 साली जोन्स यांचा जन्म झाला. 11 भावंडांमध्ये त्या एक होत्या. 1922साली त्यांनी पदवी संपादन केली. त्यानंतर त्या कुटुंबीयांना शेतीच्या कामात मदत करू लागल्या. काही वर्षांनंतर त्यांनी ते काम करणं सोडून दिलं आणि न्यूयॉर्कला निघून गेल्या. जोन्स यांना कोणतंही अपत्य नव्हतं. त्यांचं लग्नही काही काळापुरतंच मर्यादित राहिलं. त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही नेहमीच प्रेम आणि उदारता दिली. त्या नेहमीच शेती फुलवण्यासाठी स्वतःच्या काकीला शेतात मदत करत होत्या. शेतातलीच ताजी फळं आणि भाज्या त्या  खात होत्या. त्यामुळेच त्यांची प्रकृती उत्तम होती.
जोन्स या अमेरिकेतल्या 1800 सालानंतरच्या सर्वात वयोवृद्ध महिला आहेत. त्यांचा वयाची नोंद सर्वाधिक जगणा-या लोकांमध्ये झाली आहे. इटलीतल्या एम्मा मोरॅनो याही 116 वर्षं जगल्या होत्या. मात्र जोन्सपेक्षा काही महिन्यांनी त्या तरुण होत्या. मात्र त्या अधिकृत जगातल्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती नाहीत.