शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लंडनमध्ये सुरु होणार जगातील पहिलं न्यूड रेस्टॉरंट

By admin | Updated: April 22, 2016 10:53 IST

लंडनमध्ये न्यूड रेस्टॉरंट सुरु होणार आहे, ज्यासाठी 11 हजार लोकांनी नोंदणीदेखील केली आहे, जूनमध्ये हे रेस्टॉरंट लोकांसाठी खुलं करण्यात येणार आहे

ऑनलाइन लोकमत - 
लंडन, दि. २२ - एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल तर सगळ्यात पहिला प्रश्न पडतो कोणते कपडे घालायचे ?. पण लंडनमध्ये एक असं रेस्टरंट सुरु होणार आहे जिथे जाताना तुम्हाला कपड्यांची चिंता करण्याची गरज नाही. ऐकून आश्चर्य वाटेल पण लंडनमध्ये न्यूड रेस्टॉरंट सुरु होणार आहे. ज्यासाठी 11 हजार लोकांनी नोंदणीदेखील केली आहे. लंडनमध्ये सुरु होणा-या या रेस्टॉरंटचं नाव 'बुनियादी' ठेवण्यात आलं आहे. जूनमध्ये हे रेस्टॉरंट लोकांसाठी खुलं करण्यात येणार आहे.
 
हे रेस्टॉरंट दोन भागात विभागले असणार आहे. ज्यांना कपडे घालून रेस्टॉरंटमध्ये जेवायचं आहे त्यांच्या बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तर नग्न असणा-यांना वेगळी जागा असणार आहे. रेस्टॉरंटमध्ये 42 लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच हस्तनिर्मित भांड्यांवर जेवण वाढण्यात येणार आहे. रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे जेवण मिळणार आहे.
'लोकांना कोणतीही भेसळ नसलेली मस्ती करायला मिळायला हवी. कोणतीही कृत्रिम गोष्ट नसलेला अनुभव मिळावा. ज्यामध्ये कोणताही रंग, केमिकल, वीज, गॅस, फोन यांच्यासोबतच इच्छा असेल तर कपडेही नसावेत. त्यांना ख-या स्वातंत्र्याचा अनुभव मिळावा ही यामागची संकल्पना असल्याचं', रेस्टॉरंटचे मालक सेब लिआल यांनी सांगितलं आहे.
 
'ग्राहकांसमोर येणारी प्रत्येक गोष्ट नग्न असावी अशी जागा बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. रेस्टॉरंटमध्ये कोणत्याही प्रकारचा देखावा करण्यात आलेला नाही. बांबू आणि मेणबत्तीचा फक्त वापर करण्यात आला आहे. आमच्यासाठी हे खूपच आव्हानात्मक होतं, आम्ही खूप उत्साहित आहोत', असंही सेब लिआल यांनी म्हटलं आहे.
 
रेस्टॉरंटमध्ये येणा-या प्रत्येक व्यक्तीला तिकीट दिलं जाणार आहे. प्रथम येईल त्याला प्राधान्य देण्यात येईल. यासाठी रेस्टॉरंटच्या वेबसाईटवरर जाऊन रजिस्टर करावं लागणार आहे. रेस्टॉरंटमध्ये येणा-या ग्राहकांना चेंजिंग रुम आणि लॉकर्सची सुविधा देण्यात येणार आहे. ग्राहकांना आपल्या टेबलावर पोहाचेपर्यंत घालण्यासाठी कपडे देण्यात येणार आहेत. या रेस्टॉरंटमध्ये फोटो काढायला परवानगी नसणार आहे.