शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

इसिसविरुद्ध जग एकवटले

By admin | Updated: November 18, 2015 04:19 IST

फ्रान्सच्या राजधानीत इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस)ने केलेल्या भीषण नरसंहारामुळे या दहशतवादी संघटनेच्या विरोधात जगभरातील अनेक देश एकवटू लागले आहेत.

नवी दिल्ली/पॅरिस : फ्रान्सच्या राजधानीत इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस)ने केलेल्या भीषण नरसंहारामुळे या दहशतवादी संघटनेच्या विरोधात जगभरातील अनेक देश एकवटू लागले आहेत. फ्रान्सने इसिसच्या इराकमधील तळांवरही हवाई हल्ले सुरू केले आहेत. तर फ्रान्सची पाठराखण करणाऱ्या देशांना इसिसने पुन्हा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नवी दिल्लीतील परदेशी दूतावास व वकिलातींच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. भारत सतर्क असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी दिली. धाडसत्र सुरूचसोमवारच्या रात्रीही फ्रेंच पोलिसांचे धाडसत्र सुरू होते. फ्रान्समध्ये १२८ ठिकाणी छापे घालण्यात आले.हल्ल्याच्या धक्क्यातून सावरू लागलेले पॅरिस मंगळवारी पूर्ववत कामाला लागले. शोककळा असली तरी जनजीवन वेगाने पूर्ववत होऊ लागले आहे. दोन आठवड्यांपूर्वी इजिप्तमध्ये कोसळलेले विमान दहशतवाद्यांनी (इसिस) स्फोटकांद्वारे पाडल्याची रशियाने प्रथमच कबुली दिली आहे. जगभरातील मुस्लीम नेत्यांनी स्वत:ला हा गंभीर प्रश्न विचारायला हवा की, या हल्ल्याचा निषेध करण्यास आपल्या समुदायाचे नेते म्हणावे तितक्या हिरिरीने पुढे का आले नाहीत? - बराक ओबामा