शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 09:57 IST

America Iran War: वाटाघाटींमध्ये प्रगती झाली नाही, तर दोन आठवड्यांचा शस्त्रसंधीसुद्धा मोडला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

America Iran War: संपूर्ण जगाचे लक्ष लागलेली अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता बैठक कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली. दोन्ही देशात अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या. परंतु, चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स मायदेशात परतले आहेत. पाकिस्तानात झालेल्या या बैठकीत कोणताही निष्कर्ष न निघाल्याचे खापर इराणने अमेरिकेवर फोडले आहे. यातच इस्लामाबाद येथे झालेली शांतता चर्चा फिस्कटल्यानंतर आता अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्ध भडकणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. 

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी स्पष्टपणे सांगितले की, या चर्चेतून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. आमची २१ तास प्रदीर्घ चर्चा झाली, पण आम्ही कोणत्याही करारावर पोहोचू शकलो नाही. अमेरिकेने अंतिम आणि सर्वोत्तम प्रस्ताव दिला होता. जे.डी. व्हान्स यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले की, दोन्ही देशांमधील मतभेद अजूनही तीव्र आहेत. अणुकार्यक्रम आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या मुद्द्यांवर कोणताही करार झालेला नाही. व्हान्स यांनी आपल्या पत्रकार परिषदेत होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत काही सांगितले नाही. 

...तर पुन्हा युद्ध भडकण्यास फार वेळ लागणार नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. करार होवो वा न होवो, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही आधीच जिंकलो आहोत. यावरून, अमेरिका तडजोडीला बळी पडण्याऐवजी सध्या तरी दबावतंत्र सुरू ठेवू इच्छिते. नेमकी हीच गोष्ट परिस्थितीला अधिक धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. वाटाघाटींमध्ये प्रगती झाली नाही, तर दोन आठवड्यांचा शस्त्रसंधीसुद्धा मोडला जाऊ शकतो. जर असे झाले, तर पुन्हा युद्ध भडकण्यास फार वेळ लागणार नाही, असा कयास बांधला जात आहे.

कोणताच तोडगा निघाला नाही, याला अमेरिका जबाबदार

इराणची सरकारी वृत्तसंस्था 'फर्स'ने पाकिस्तानमधील इराणी शिष्टमंडळाच्या जवळच्या सूत्रांचा हवाला देत एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. इराणचा असा विश्वास आहे की, अमेरिकेला जगासमोर आपली गमावलेली विश्वासार्हता परत मिळवण्यासाठीच या चर्चांची गरज होती. इराणचा आरोप आहे की, युद्धभूमीवर पराभव आणि अपयशांना सामोरे जाऊनही अमेरिका माघार घ्यायला तयार नव्हती. चर्चेच्या टेबलावर ती अशा अमान्य अटी लादत होती, जेणेकरून चर्चा फिसकटल्याचा दोष इराणवर टाकता येईल.

दरम्यान, इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी चर्चेदरम्यान एका व्हिडिओ संदेशात स्पष्टपणे सांगितले की, ही मोहीम अजून संपलेली नाही. आम्ही अजूनही लढत आहोत. इराणकडे अजूनही संवर्धित युरेनियम आहे, जे कराराद्वारे किंवा इतर मार्गांनी नष्ट केलेच पाहिजे. जर राजनैतिक वाटाघाटी अयशस्वी ठरल्या, तर लष्करी पर्याय अजूनही उपलब्ध आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : US-Iran Talks Fail: War Looms? World Watches Tense Situation.

Web Summary : US-Iran talks in Pakistan failed, escalating war fears. Iran blames America for unrealistic demands. Netanyahu insists Iran's enriched uranium must be destroyed, hinting at military action if diplomacy fails. Tensions remain high.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प