शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप सहन करणार नाही; जिनपिंग यांनी अमेरिकेला ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 04:17 IST

हैनानस्थित प्रभावशाली थिंकटँक बाओ फोरम फॉर आशियामध्ये (बीएफए) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वार्षिक संवाद साधताना चिनी राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की, आजच्या जगात आम्हाला न्यायाची गरज आहे. वर्चस्वाची नव्हे.

बिजिंग : चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये इतर देशांचा हस्तक्षेप किंवा दबाव सहन करणार नाही, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेला ठणकावले आहे.तैवान व हाँगकाँगमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत अमेरिका व तिचे सहयोगी देश चीनवर दबाव वाढवित आहेत. त्याबाबत अमेरिकेचा थेट उल्लेख न करता जिनपिंग यांनी म्हटले आहे की, इतरांचा अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप कोणीही सहन करणार नाही. आम्हाला शांतता, विकास, समानता, न्याय, लोकशाही व स्वातंत्र्याचा पुरस्कार केला पाहिजे. हीच मानवतेची मूल्ये आहेत. मानवी सभ्यतेच्या प्रगतीसाठी तसेच परस्पर आदान-प्रदान करण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहित करणारी आहेत.

हैनानस्थित प्रभावशाली थिंकटँक बाओ फोरम फॉर आशियामध्ये (बीएफए) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वार्षिक संवाद साधताना चिनी राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की, आजच्या जगात आम्हाला न्यायाची गरज आहे. वर्चस्वाची नव्हे. बड्या देशांनी त्यांच्या उंचीला शोभेल असे वर्तन केले पाहिजे. त्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर निर्बंध घालण्याच्या प्रस्तावित धोरणाचे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जोरदार समर्थन केलेले आहे. बायडेन यांनी चीनसंबंधी आपल्या धोरणांबाबत ब्रिटन, युरोपीय संघ व जपान यासारख्या सहयोगींना एकजूट केले आहे. 

अमेरिकेने जपान, ऑस्ट्रेलिया व जपान यांच्यासह चतुष्कोणीय समूह (क्वाड)ची पहिली शिखर चर्चाही आयोजित केली होती.अमेरिका, युरोपीय संघ, ब्रिटन व कॅनडाने शिनझियांगमध्ये उईगर मुस्लिमांच्या विरोधात कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत चीनवर समन्वित निर्बंध लावले आहेत. तथापि, चीनने याबाबतचे आरोप फेटाळले आहेत. या देशांनी हाँगकाँगवर चीनचे अधिपत्य स्थापित करण्याच्या विरोधातही आपले मतैक्य केले आहे.

‘कोरोना महामारीला जगाने एकजूट होऊन हरवावे’nहाँगकाँगहून संचलित होणाऱ्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, बीएफएच्या बैठकीत ॲपलचे सीईओ टिम कुक, टेस्लाचे एनल मस्क, ब्लॅकस्टोनचे स्टिफन श्वार्जमॅन व ब्रजवॉटरचे रे डेलियो यांनी सहभाग नोंदविला. nचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या भाषणात आशिया व त्याच्या बाहेर सर्व देशांना आवाहन केले की, कोरोना महामारीला संपूर्ण जगाने एकजुटीने हरवावे व मानवतेसाठी उज्ज्वल भविष्य समोर ठेवून समुदायाच्या रूपाने काम करीत राहावे. 

टॅग्स :Xi Jinpingशी जिनपिंगAmericaअमेरिका