शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तालिबानी नेता दहशतवादी का नाही!

By admin | Updated: September 16, 2016 01:22 IST

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंधित लोकांच्या यादीत तालिबानी नेत्याचा दहशतवादी म्हणून समावेश करण्यात न आल्याबद्दल भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंधित लोकांच्या यादीत तालिबानी नेत्याचा दहशतवादी म्हणून समावेश करण्यात न आल्याबद्दल भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. या तालिबानी नेत्याला दहशतवादी घोषित न करणे हे एक रहस्यच आहे, असे भारताने म्हटले आहे.यासोबतच भारताने पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढविला. अफगाणिस्तानमध्ये हिंसाचाराचा कट रचणाऱ्या लोकांना त्यांच्याच शेजारी सुरक्षित स्थळ मिळू नये, असे भारताने स्पष्ट केले. सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानच्या संदर्भात सुरू असलेल्या एका चर्चेत बोलताना भारताचे स्थायी उपप्रतिनिधी तन्मय लाल म्हणाले, ‘तालिबान या प्रतिबंधित संघटनेच्या नेत्याला दहशतवादी म्हणून घोषित न करणे हे आमच्यासाठी एक रहस्य बनलेले आहे. संयुक्त राष्ट्राने घेतलेल्या या भूमिकेमागची कारणे आम्हाला कळू शकतील काय?’गेल्या मे मध्ये मुल्ला मुहम्मद मंसूर हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेल्यानंतर तालिबानने मौलवी हैबतुल्ला अखुंदजादा याला आपला नवा नेता घोषित केले होते. परंतु अखुंदजादा याचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत कुठेही नाही, हे विशेष. एका प्रतिबंधित संघटनेच्या प्रमुखाला दहशतवादी घोषित न करून वैश्विक संस्था शांती आणि सुरक्षेच्या समक्ष उभ्या ठाकलेल्या सर्वांत मोठ्या धोक्याचा (दहशतवाद) सामना कसा करणार, असा सवालही लाल यांनी उपस्थित केला. (वृत्तसंस्था)