वॉशिंग्टन : अध्यक्ष बराक ओबामा यांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये घुसल्याबद्दल एकाला अटक केली. शनिवारी व्हाईट हाऊसच्या कुंपणाला ओलांडून एक जण व्हाईट हाऊसमध्ये घुसला होता. या घटनेनंतर हा ताजा प्रकार घडला.गुप्तचर सेवेचे प्रवक्ते एड डोनोवन यांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती व्हाईट हाऊसच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचली होती, त्याला अधिकाऱ्यांनी परत पाठविले. थोड्या वेळाने हीच व्यक्ती त्याच्या कारने व्हाईट हाऊसच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचली. त्यानंतर त्याला अटक केली. शनिवारच्या घटनेच्या तुलनेत ताजा प्रकार हा किरकोळ असल्याचे डोनोवन यांनी सांगितले. हे असे प्रकार रोजचे असल्याचे एड डोनोवन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
व्हाईट हाऊसमध्ये घुसणा-यास अटक
By admin | Updated: September 22, 2014 03:34 IST