शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

आता रोबो करतोय ग्राहकांचे स्वागत

By admin | Updated: April 20, 2015 23:58 IST

ती स्मितहास्य करते, ती गाते आणि आता तर ती टोकिओतील एका मॉलमध्ये स्वागतासाठी उभी आहे. रोबो असणाऱ्या या स्वागतिकेचे वैशिष्ट्य असे की,

टोकिओ : ती स्मितहास्य करते, ती गाते आणि आता तर ती टोकिओतील एका मॉलमध्ये स्वागतासाठी उभी आहे. रोबो असणाऱ्या या स्वागतिकेचे वैशिष्ट्य असे की, कितीही वेळ काम केले तरीही ती थकत नाही. टोकिओच्या अप मार्केटमधील या दुकानात ती ग्राहकांचे सुहास्य वदनाने स्वागत करते. माय नेम इज चिहिराआयको, हाऊ डू यू डू? असे ती जपानी भाषेत म्हणते, मान हलवून गोड हास्य करणारी तिची मूर्ती जपानच्या मित्सुकोशी या जुन्या डिपार्टमेंट स्टोअरमध्ये उभी आहे. चिहिराआयको हे जपानी महिलांचे लोकप्रिय नाव आहे. चिहिराचा पोशाखही जपानी किमोनो हा आहे. ग्राहक आला की तिचे गुलाबी ओठ उमलतात. आय अ‍ॅम चिहिरा...स्वागताचे शब्द उमटतात. पारंपरिक स्वागतिका व चिहिरा यांच्यात फरक इतकाच की चिहीरा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. तिच्या रेकॉर्ड केलेल्या बोलण्याव्यतिरिक्त ती काहीच बोलू शकत नाही. पण तिची कांती मानवी आहे, तिच्या हालचाली मानवासारख्या (पूर्णपणे मानवी नव्हे) आहेत. मायक्रोवेव्हपासून ऊर्जानिर्मितीपर्यंत अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या तोशिबा या प्रसिद्ध कंपनीने हा मानवी रोबो तयार केला आहे. माणूस जे काम करतो, ते सर्व काम करणारा रोबो तयार करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे कंपनीचे प्रमुख तंत्रज्ञ हितोशी तोकुडा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)