शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इसिसकडील शस्त्रे अमेरिका, चीनची

By admin | Updated: October 6, 2014 22:58 IST

जिहादी संघटना इसिस (इस्लामिक स्टेट इन इराक अँड सिरिया) ने इराक व सिरियात लढण्यासाठी वापरलेली शस्त्रास्त्रे अमेरिका व चीनने पुरविलेल्या शस्त्रास्त्रांपैकी असल्याचे आता स्पष्ट झाले

न्यूयॉर्क : जिहादी संघटना इसिस (इस्लामिक स्टेट इन इराक अँड सिरिया) ने इराक व सिरियात लढण्यासाठी वापरलेली शस्त्रास्त्रे अमेरिका व चीनने पुरविलेल्या शस्त्रास्त्रांपैकी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हे देश इसिसच्या विरोधात लढणाऱ्या आघाडीतील प्रमुख देश आहेत. शस्त्रास्त्रांचा शोध घेणाऱ्या खाजगी संघटनेने हा दावा केला आहे. सिरिया व इराकमध्ये सापडलेली शस्त्रास्त्रे व काडतुसे हा या प्रकरणी गोळा करण्यात आलेल्या पुराव्याचा एक भाग असून, दुसऱ्या देशात हस्तक्षेप करणाऱ्या तसेच जागतिक धोरण आखणाऱ्या लोकांना हा निर्वाणीचा इशारा आहे. सिरिया व इराकमधील सरकार स्थिर करण्यासाठी पाठविलेली शस्त्रास्त्रे व दारुगोळा त्या सरकारकडून जिहादी संघटनांकडे सोपविण्यात आला व इस्लामिक स्टेट अस्तित्वात येण्यास एकापरीने मदतच झाली, तसेच जिहादी संघटनांचे बळ या शस्त्रास्त्रांनी वाढविले. या शस्त्रास्त्रातील रायफलची काडतुसे अमेरिकेची असून, या काडतुसांनी इस्लामिक स्टेटच्या उदयात प्रमुख भूमिका बजावली आहे. कॉन्फ्लिक्ट आर्मामेंट रिसर्च या संघटनेचे जेम्स बीव्हन यांनी ही माहिती दिली. ही संघटना इसिसने वापरलेली शस्त्रास्त्रे गोळा करत असून त्याचे विश्लेषण करत आहे. इसिसला मिळालेली शस्त्रे सिरियातील सरकारविरोधी बंडखोरांनी पुरविली असे विश्लेषकांचे मत आहे. सिरियातील बंडखोरांना परदेशाकडून मिळालेली शस्त्रास्त्रे, जिंकलेल्या भागात मिळालेली शस्त्रास्त्रे, तसेच इराक व सिरियाच्या लष्करातील भ्रष्ट सदस्यांकडून मिळालेली शस्त्रास्त्रे गोळा करून इसिसने लढा दिला आहे. कॉन्फ्लिक्टने जमा केलेल्या माहितीनुसार १७३० काडतुसे अमेरिकन असून, ती रायफली व मशीनगनमध्ये वापरता येतात. कॉन्फ्लिक्टला युरोपियन युनियनकडून निधी मिळत असून, इसिस बंडखोरांना शस्त्रास्त्रे कशी व कोठून मिळाली याचा शोध घेण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)