शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

'आपल्यावर लोकांची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी'; PM मोदीचे AI परिषदेत आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:44 IST

पॅरिसमध्ये होत असलेल्या एआय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी नव्या एआय तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संधींसाठी लोकांना तयार करावं लागेल, असे आवाहन केले. 

PM Modi AI Summit: पॅरिसमध्ये सुरू असलेल्या एआय परिषदेत (AI Summit) पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. भारत आपल्या लार्ज लँग्वेज मॉडेल (मोठ्या भाषिक प्रतिमान) काम करत आहे. त्याचबरोबर एआयवर आधारित ज्ञानाचा पूल तयार करत आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी एआयशी संबंधित मुद्द्यांवर मोदींनी भाष्य केले. पॅरिसमधील एआय कृती परिषदेचा भारत सह-अध्यक्ष आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एआय परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "एआय आता गरज बनले आहे. आमच्याजवळ जगातील सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आहे. त्याचबरोबर आपल्यावर लोकांची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही आहे. यंत्रांची ताकद वाढत असल्याने काही लोक चिंतेत आहेत. पण, यात काळजी करण्यासारखं काही नाही."

एआयमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील -मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, "एआय लाखो लोकांचे आयुष्य बदलत आहे. काळाबरोबर रोजगाराचे स्वरूपही बदलत आहे. आपल्याला एआयमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संकटाकडेही लक्ष द्यावं लागेल."

"तंत्रज्ञान नोकऱ्या खात नाही, याला इतिहास साक्षी आहे. एआयमुळेही नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील आणि आपल्याला नव्या संधीसाठी लोकांना तयार करावे लागेल", असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. 

पंतप्रधान मोदी यांनी भाषणात भारताच्या एलएलएमबद्दलही (लार्ज लँग्वेज मॉडेल) माहिती दिली. भारत लवकरच आपले लार्ज लँग्वेज मॉडेल विकसित करेल, असे ते म्हणाले. 

भारताच्या एलएलएम मॉडेलची चर्चा होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही याबद्दल माहिती दिली होती. भारत लवकरच एलएलएम हे एआय मॉडेल विकसित करेल, असे त्यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानParisपॅरिस