शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

झुकेरबर्गच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर युद्ध

By admin | Updated: May 15, 2015 00:24 IST

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनीच आपल्या पोस्टवर भारताचा नकाशा टाकताना चूक केली आणि सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तानदरम्यान

नवी दिल्ली : फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनीच आपल्या पोस्टवर भारताचा नकाशा टाकताना चूक केली आणि सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धाची ठिणगी पडली. फेसबुक कॉमचे सीईओ असलेल्या झुकेरबर्ग यांनी त्यांचीच ब्रेनचाईल्ड मानल्या जाणाऱ्या ‘इंटरनेट आॅर्ग’ या साईटवर इन्फो- ग्राफिकमध्ये भारताचा उल्लेख करताना वापरलेल्या नकाशात जम्मू-काश्मीरचा न केलेला समावेश हे त्यामागचे कारण ठरले. भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असतानाच काहींनी झुकेरबर्ग यांचे समर्थन करीत वादात तेल ओतले आहे. इन्फो- ग्राफिकमध्ये भारताचा उत्तर भाग दिसत नसल्याचे निदर्शनास येताच भारतीयांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडत झुकेरबर्ग यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ‘ग्रेट जॉब, प्लीज करेक्ट द इंडियन मॅप, काश्मीर इज मिसिंग ’ अशी प्रतिक्रिया अखिल देव यांनी दिली. त्यानंतर प्रतिक्रियांचा वर्षाव होत राहिला.भारताचा नकाशा शेअर करताना तो चुकीचा तर नाही नां, याची खातरजमा करायला हवी होती. काश्मीर हे भारताचे राज्य असताना त्याला भारताचा भाग न दाखविणे खरोखर निराशाजनक आहे, असे अन्य एका प्रतिक्रियेत म्हटले आहे.