शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

युद्धकैदी मीर अलीला लवकरच होणार फाशी

By admin | Updated: September 1, 2016 04:22 IST

बांगलादेशमधील १९७१ च्या युद्ध गुन्ह्यांचा दोषी आणि कट्टरपंथी जमात-ए-इस्लामशी संबंधित उद्योगपती मीर कासिम अलीला फाशी देण्याची तयारी सुरू झाली आहे.

ढाका : बांगलादेशमधील १९७१ च्या युद्ध गुन्ह्यांचा दोषी आणि कट्टरपंथी जमात-ए-इस्लामशी संबंधित उद्योगपती मीर कासिम अलीला फाशी देण्याची तयारी सुरू झाली आहे. तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मीर कासिम अलीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली. न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच ६४ वर्षीय अलीची पुनरावलोकन याचिका फेटाळली होती. कासिमपूर सेंट्रल जेलचे अधीक्षक प्रशांत कुमार बानिक यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्हाला निर्णयाची माहिती मिळाली आहे, तर अलीसमोर ही प्रत सकाळीच वाचण्यात आली. अली पाकिस्तानचा समर्थन करणाऱ्या कुख्यात ‘अल-बदर मिलिशिया’चा तिसरा प्रमुख व्यक्ती आहे. त्याच्यापूर्वीच्या दोन प्रमुख व्यक्ती ‘जमात-ए-इस्लामी’चा प्रमुख मोती उर रहमान निजामी आणि महासचिव अली अहसन मुहम्मद मुजाहिद यांना मृत्युदंड देण्यात आला आहे. अलीला १९७१ च्या मुक्तिसंग्रामात मानवतेविरुद्ध गुन्हा करण्याबद्दल दोषी ठरविले आहे. दरम्यान, अ‍ॅटर्नी जनरल महबुबे आलम यांनी सांगितले की, अली राष्ट्रपतींकडे क्षमायाचना करू शकतो. आता त्याच्याकडे एकमेव पर्याय आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार अलीने राष्ट्रपतींकडे क्षमायाचना करण्यासाठी वेळ मागितला आहे. (वृत्तसंस्था)मीर कासिम अलीला फाशी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अलीने अमेरिकेची लॉबी कंपनी कॅसिडी अ‍ॅण्ड असोसिएटस्बरोबर २.५ कोटी डॉलरचा सौदा केला होता. या माध्यमातून आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणण्यासाठी अमेरिका आणि बांगलादेश सरकारला एकजूट केले जावे, हा उद्देश होता. १९७१ मध्ये जमातची तत्कालीन विद्यार्थी संघटना इस्लामी छात्र संघाचा युवा नेता राहिलेला अलीने स्वातंत्र्य मागणाऱ्या निर्दोष लोकांना त्रास दिला आणि जनतेत दहशत निर्माण केली. बांगलादेशचे दोन अतिरेकी लपले भारतात? बांगलादेशमधील अतिरेकी संघटना जमात- उल- मुजाहिदीनचे दोन अतिरेकी भारतात लपले असल्याचा संशय बांगलादेशने व्यक्त केला आहे. याबाबतच्या एका अहवालात असेही म्हटले आहे की, ढाक्यातील कॅफेत १ जुलै रोजी झालेल्या हल्ल्यासाठी हत्यारे आणि आर्थिक मदतीसाठी हे दोन अतिरेकी भारतात गेले होते. या दोन अतिरेक्यांपैकी एक शरीफुल इस्लाम खालीदवर एका प्रोफेसरच्या हत्येचा आरोप आहे.