ऑनलाइन लोकमतबोगोटा, दि. 1 - कोलंबियातील फार्क या विद्रोही गटाच्या बंडखोरांनी शुक्रवारी हजारो शस्त्रे आंतरराष्ट्रीय अधिकार्यांना सुपूर्द करून आत्मसर्मपण केले. फार्कच्या सशस्त्र संघर्षात दोन लाखांपेक्षा जास्त जण मृत्युमुखी पडले होते. फार्कने गतवर्षी येथील सरकारसोबत शांतता करार केला. लॅटीन अमेरिकेतील दीर्घकाळ चालणार्या बंडखोरीस पूर्णविराम लाभण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारपर्यंत आठ हजार बंडखोरांनी आत्मसर्मपण के ले होते, तर, जूनपर्यंत फार्कचे सर्वच बंडखोर आत्मसर्मपण करणार आहेत. संयुक्त राष्ट्रे तीन ठिकाणी त्यांच्या शस्त्रास्त्रांचे संग्रहालय साकारणार असल्याचे वृत्त आहे.
कोलंबियात शेकडो बंडखोरांचे आत्मसर्मपण
By admin | Updated: April 1, 2017 01:47 IST