शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ज्वालामुखीचा उद्रेक

By admin | Updated: September 29, 2014 05:56 IST

माऊंट आॅन्टेक या डोंगराच्या माथ्यावर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात ३० जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टोकिओ : माऊंट आॅन्टेक या डोंगराच्या माथ्यावर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात ३० जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. टोकिओ शहरापासून २०० किलो मीटर दूर असलेल्या या पठारावर तप्त राखेचे प्रचंड लोळ उठले असून ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हा डोंगर ढासळल्याने खालच्या दिशेने तप्त लाव्हा रस वाहत आहे. डोंगराच्या शिखरानजीकच्या भागात ३० जण बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांची श्वसनक्रिया बंद होती. त्यांची ओळख पटली नाही. ज्वालामुखी सक्रिय झाला त्यावेळी या डोंगराच्या पायथ्याला २०० लोक अडकले होते. रविवारी रात्रीपर्यंत या ज्वालामुखीच्या तोंडातून त्यांची सुखरूपणे सुटका करण्यात यश आले.शनिवारपासून या ठिकाणी ज्वालामुखी धगधगत आहे. सर्वत्र तप्त राखेचे लोळ उठले आहेत. तप्त राखेचे लोट वेगाने खाली वाहत असल्याने पायथ्यालगतच्या भागातील स्थिती गंभीर बनली आहे. रविवारपासून या भागात बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले असून हेलिकॉप्टरच्या मदतीने तेथे अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे इतरत्र हलविण्यात येत आहे. जीव वाचविण्याच्या धडपडीत ४० जण जखमी झाले असून अनेकांची हाडे मोडली आहेत. ४५ जणांचा ठाव लागत नाही. प्रशासन त्यांचा शोध घेत आहे, असे अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सांगितले.जपानमध्ये अधूनमधून ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. कारण जपान हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देश आहे. त्यामुळे भूगर्भीय हालचालीवर सातत्याने लक्ष दिले जाते, तसेच ज्वालामुखी सक्रिय होत असल्याचे संकेत मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना वेळीच सावधानतेचा इशारा देऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात येते. १९९१ पासून ज्वालामुखी उद्रेकात एकाचा मृत्यू झालेला नाही. (वृत्तसंस्था)