शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या तोंडावर हिंसाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:07 IST

उमेदवार गंभीर जखमी; वाहनचालक, सुरक्षारक्षकासह दोन ठार

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये २५ जुलैैला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेथील वातावरण तापू लागले असून हिंसाचाराच्या घटनाही वाढत आहेत. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चा उमेदवार अतिरेक्यांनी रविवारी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून, त्याचे अंगरक्षक व वाहनचालक असे दोघे जण ठार झाले आहेत. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानातील उमेदवारांवर झालेला हा तिसरा हल्ला आहे.खैैबर पख्तुनवा येथील डेरा इस्माइल खान या भागात पीटीआयचे उमेदवार इक्रमुल्ला गंडपूर हे पीके-९९ या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रचारासाठी जाताना त्यांच्या वाहनावर आत्मघाती हल्ला केला गेला. त्यात इक्रमुल्ला गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खैैबर पख्तुनवा प्रांताचे ते माजी कृषीमंत्री आहेत. इक्रमुल्ला यांचे भाऊ व माजी कायदामंत्री इसरुल्ला गंडपूर हे दहशतवाद्यांच्या हल्ल्यातच ठार झाले होते. त्यानंतर पीके-६७ मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत इक्रमुल्ला निवडून आले होते.बन्नू जिल्ह्यातही जमियत-उलेमा-इस्लाम-फज्ल (जेयूआय-एफ)चे नेते अक्रम खान दुर्रानी हे मात्र त्यांच्या वाहनावर दहशतवाद्याने केलेल्या गोळीबारातून सुदैैवाने बचावले. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या विरोधात अक्रम खान दुर्रानी मुत्तहिदा मजलिस-ए-अमल या पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत. गेल्या काही दिवसांत दुर्रानी यांच्यावर झालेला हा दुसरा हल्ला असून बन्नू जिल्ह्यात आतापर्यंत उमेदवारांवर तीन हल्ले झाले आहेत.आयएसआयविरोधात निदर्शनेनवाझ शरीफ यांच्या समर्थकांनी रावळपिंडी येथील आयएसआयच्या मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. ‘यह जो दहशद गर्दी हैै, उसके पिछे वर्दी हैै अशा आयएसआयच्या निषेध करणाºया घोषणा ते देत होते. त्यांनी आयएसआय मुर्दाबादच्या घोषणांनीही परिसर दणाणून सोडला होता. या पक्षाचे नेते हनीफ अब्बासी यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने हे कार्यकर्ते संतप्त झाले होते. पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांत आयएसआयने गडबड, गोंधळ चालविली असल्याचा आरोपही या शरीफ समर्थक निदर्शकांनी केला. (वृत्तसंस्था)लष्कर-न्यायसंस्थेत जुंपलीसर्वोच्च न्यायालयास चौकशीची विनंतीइस्लामाबाद: भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कैदेत असलेले माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांना येत्या २५ जुलैची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत काहीही केल्या तुरुंगाबाहेर येता येऊ नये यासाठी पाकिस्तान लष्कराची ‘आयएसआय’ ही गुप्तचर संस्था न्यायसंस्थेवर दबाव आणत आहे, असा जाहीर आरोप इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने केल्यानंतर पाकिस्तानचे लष्कर आणि न्यायसंस्था यांच्यात रविवारी उघड संघर्षाची स्थिती समोर आली.इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. शौकत अझीझ सिद्दिकी यांनी वकील संघटनेच्या एका कार्यक्रमात बोलताना असा आरोप केला की, ‘आयएसआय’चे लोक न्यायालयीन प्रकरणांमध्ये लुडबूड करतात व ठराविक प्रकरणांमध्ये आपल्याला हवे तसे निकाल लागावेत यासाठी पसंतीच्या न्यायाधीशांची खंडपीठांवर नेमणूक करून घेतात. नवाज शरीफ व त्यांची मुलगी मरियम यांनी भ्रष्टाचार खटल्यातील शिक्षेविरुद्ध केलेल्या अपिलातही हेच घडत आहे व शरीफ निवडणूक होईपर्यंत तुरुंगाबाहेर येऊ नयेत, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.‘आयएसआय’चा एक अधिकारी ‘तुम्हाला मुख्य न्यायाधीश करतो’, अशी ‘आॅफर’ घेऊन आपल्याकडे आला होता, असेही न्या. सिद्किी म्हणाले होते. याच सिद्दिकी यांनी लष्कर व ‘आयएसआय’ यांनी राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करावे व सरकारच्या अन्य विभागांच्या कामांत नस्ती लुडबूड करू नये, असा लेखी आदेशही गेल्या आठवड्यात एका प्रकरणात दिला होता.या पार्श्वभूमीवर लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटले की, जबाबदार पदावर असलेल्या न्यायाधीशांनी केलेल्या या गंभीर आरोपांची चौकशी करून लष्कर व न्यायसंस्था यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी तत्परतेने योग्यती कारवाई केली जावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयास लष्कराने केली आहे.दरम्यान, पाकिस्तानचे सरन्यायाधीश न्या. साकिब निसार यांनीही न्या. सिद्दिकी यांच्या वक्तव्यांची गंभीर दखल घऊन त्यांच्या या जाहीर भाषणाचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर करणयाचे निर्देश देशाच्या इलेक्ट्रॉनिक माध्यम नियामक प्राधिकरणास दिले आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानElectionनिवडणूक