शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

विजय माल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर

By admin | Updated: June 13, 2017 18:32 IST

न्यायालयानं विजय माल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर केला आहे.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 13 - भारतीय बँकांचे 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार पळालेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयच्या न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयानं विजय माल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर केला आहे. तसेच मीडियाला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही, असंही विजय माल्यानं सुनावलं आहे. मी माझ्यावरील सर्व आरोप नाकारतो, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पुरावे आहेत, असंही माल्यानं सांगितलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी माल्याच्या अटकेसाठी सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वाखाली अंमलबजावणी संचलनालयाचे काही अधिकारीही लंडनमध्ये गेले होते. मात्र त्यांना रिकाम्या हातांनी परतावं लागलं होतं. फरार घोषित केलेल्या विजय माल्याला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या प्रकरणात विजय माल्याला गेल्या महिन्यात लंडनमध्ये अटकही केली होती. मात्र काही वेळानंतर त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली. भारताच्या अपीलवर माल्याला स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. दोन्ही देशांमध्ये विजय माल्याच्या मुद्द्यावर करारही झाला होता. विजय माल्याला भारतात आणणं मोदी सरकारसाठी मोठं आव्हान ठरत आहे. भारतानं लंडनमधून माल्याच्या प्रत्यार्पणासाठी कूटनीतीचासुद्धा उपयोग केला होता.आता ते प्रकरण तिथल्या स्थानिक कोर्टात आहे. माल्याच्या अटकेनंतर ब्रिटिश कोर्टानं त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी भारतातून सीबीआयच्या वरिष्ठ अधिका-यांसह एक टीम लंडनमध्ये दाखल झाली आहे. विजय माल्या स्वतःच्या प्रत्यार्पणाला आव्हानही देऊ शकतो. माल्या प्रत्यार्पणाला राजकारणाच्या दृष्टीने अटक करत असल्याचा आरोप करत त्याला विरोधही करू शकतात. स्वतःच्या प्रत्यार्पणाला माल्या मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचा स्पष्ट करण्याचाही प्रयत्न करू शकतो.