शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर खो-यात लपलेल्या दहशतवाद्यांचा व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 15:01 IST

हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.या व्हिडीओत दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र दिसत आहेत.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 20 - भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईकनंतर धसका घेतलेल्या पाकिस्तानने भारताविरोधात कटकारस्थान रचायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ काश्मीर खो-यातील असून यात एकूण बारा दहशतवादी आहेत. त्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्रास्त्र दिसत आहे. तर यातील एक जण लष्करातील गणवेशातही दिसत आहे.  
 
या व्हिडीओमध्ये, या दहशतवाद्यांनी फळांच्या बागेत आपला अड्डा बसवला असून न घाबरता हसत-खेळत एकमेकांशी बोलताना , मिठी मारताना दिसत आहेत. त्याच्या हातात इन्सास (INSAS) रायफल्सदेखील दिसत आहेत, ज्या केवळ भारतीय जवानांकडे असतात. भ्याड हल्ले करुन या रायफल्स त्यांनी चोरल्या आहेत. 
 
सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमारेषेजवळ पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांकडून सीमारेषेवर भारतीय पोलीस चौक्यातील शस्त्रास्त्र चोरण्याच्या, हिसकावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आतापर्यंत जवळपास 67 रायफल्स हिसकावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  
 
याआधी हिजबुल मुजाहिद्दीनचा नवा म्होरक्या झाकिर रशिद भट जो 'मुसा' म्हणून ओळखला जातो, त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडीओमध्ये मुसा तरुण-तरुणींना दहशतवादी गटात सामील होण्यासाठी सांगत असून त्यांना भारतीय सुरक्षा रक्षकांकडून रायफल्स चोरण्यासाठी, हिसकावण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे दिसत होते. काश्मीर खो-यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांनी हात मिळवणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
हिजबुल मुजाहिद्दीनचा ठार झालेला दहशतवादी बुरहान वनी सोशल मीडियावर सक्रीय होता.  शस्त्रांसहीत फोटो, व्हिडीओ काढून तो भारतीय लष्कराला डिवचण्याचे काम करत होता. काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्कराच्या चकमकीत बुरहान वनीचा खात्मा करण्यात आला.