शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- धक्कादायक! एअरलाइन्स कर्मचा-यांनी प्रवाशाला फरफटत नेले विमानाबाहेर

By admin | Updated: April 11, 2017 11:30 IST

अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सच्या विमानातून एका प्रवाशाला जबरदस्तीनं फरफटत बाहेर काढण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. 11 - अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सच्या विमानातून एका प्रवाशाला जबरदस्तीनं फरफटत बाहेर काढण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सर्व प्रकाराचा सोशल मीडियावर एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्यामुळे एअरलाइन्ससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. एअरलाइन्सच्या कर्मचा-यांची विमानातील प्रवाशांशी गैरवर्तणुकीची महिन्याभरातील ही दुसरी घटना समोर आली आहे. शिकागोहून लुइसविलेमार्गे केंटुकीला जाणारं विमान 3411मध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रवाशाला ज्या प्रकारे फरफटत बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे लोकांना राग अनावर झाला आणि ट्विटरवरून लोकांनी संताप व्यक्त केला. एका व्यक्तीनं या घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून, विमानातून कशा प्रकारे एअरलाइन्सचे कर्मचारी प्रवाशाला फरफटत बाहेर काढतायत हे यात पाहायला मिळतं आहे. विमान आधीच जास्त भरलं होतं आणि एअरलाइन्स क्रूच्या इतर सदस्यांनाही त्याच विमानातून प्रवास करायचा असल्यानं कर्मचा-यांनी प्रवाशासोबत असा गैरप्रकार केला. प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर युनायटेड एअरलाइन्सनं विमान ओव्हरबुक झाल्याची बाब पुढे केली. युनायटेड एअरलाइन्सचे प्रवक्ते चार्ली होबर्ट म्हणाले, आमच्या टीमनं प्रवाशांना आवाहन केलं होतं की तुम्ही स्वतःहून विमानातून खाली उतरा, कारण विमान क्षमतेपेक्षा जास्त भरलं होतं. मात्र एका प्रवाशानं विमानातून उतरण्यास नकार दिला. विमान क्षमतेपेक्षा जास्त भरल्यानं आम्ही माफी मागतो. तर विमानातील एका प्रवाशानं सांगितलं की, सुरक्षारक्षकांनी जबरदस्तीनं एका प्रवाशाला त्याच्या जागेवरून उठवलं आणि फरफटत त्याला बाहेर नेलं. त्या प्रवाशाच्या तोंडातून रक्त येत होतं. अशाच प्रकारे दोन्ही महिन्यांपूर्वी मुलींना त्यांच्या पेहरावावरून विमानात घेण्यास मज्जाव केला होता. एकंदरीत एअरलाइन्सच्या कर्मचा-यांचा मुजोरपणा या सर्व प्रसंगातून समोर आला आहे.