शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
4
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
5
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
6
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
7
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
8
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
9
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
10
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
11
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
12
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
13
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
14
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
15
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
16
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
17
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
18
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
19
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
20
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

VIDEO- गगनचुंबी घरेही घेणार गिरकी, स्थापत्य कलेचा दुबईत चमत्कार

By admin | Published: February 17, 2017 6:47 PM

ऑनलाइन लोकमत दुबई, दि. 17 - गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञानात नवनवे प्रयोग केले जात आहेत. माणसाच्या आयुष्यासारखेच तंत्रज्ञानातही दिवसेंदिवस ...

ऑनलाइन लोकमतदुबई, दि. 17 - गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञानात नवनवे प्रयोग केले जात आहेत. माणसाच्या आयुष्यासारखेच तंत्रज्ञानातही दिवसेंदिवस बदल होतायत. गिरक्या घालणा-या पक्ष्यांप्रमाणे तुम्हाला घरेही गिरक्या घेताना दिसणार आहेत. दुबईमध्ये गिरक्या घालणारी एक इमारत बनवण्यात येणार असून, स्थापत्य कलेचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळणार आहे. या इमारतीमध्ये राहणा-या माणसांनाही झोपाळ्यावर बसण्याचा आनंद मिळणार आहे. 80 मजल्यांची ही इमारती 90 मिनिटांमध्ये 360 अंशांच्या कोनामध्ये फिरणार आहे. या इमारतीचा मजला एका मिनिटात जास्तीत जास्त 6 मीटर फिरणार आहे. अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड टॉवरच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या अनोख्या इमारतीत सुरक्षेबाबतही काळजी घेण्यात आली आहे. इमारतीचा प्रत्येक मजला रिव्हॉल्व्हिंग ठेवण्यात येणार असून, खिडक्यांमधून तुम्हाला फिरत्या जगाचा आविष्कार पाहायला मिळणार आहे. जगातली ही पहिली फिरती इमारत दुबईमध्ये बनवली जाणार आहे. इमारतीची रचना वास्तूकार डेव्हिड फिशर यांनी तयार केली आहे. फिशर यांनी इमारतीचं मॉडेल न्यू यॉर्कमध्ये दाखवलं आहे. इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील काम 6 महिन्यांमध्ये पूर्ण होणार असून, 2020पर्यंत तयार होणार आहे. या इमारतीचा प्रत्येक मजला मजबूत सिमेंट बेसच्या माध्यमातून गिरक्या घेणार आहे. इमारतीतील लोकांना पर्सियन गल्फ आणि दुबईतल्या चहूबाजूंकडील सुंदर नजारे पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे ही इमारत विजेचीही निर्मिती करणार असून, ती वीज इमारतीतील लोकांना वापरता येणार आहे. रचनेनुसार प्रत्येक मजल्याच्या मधोमध पवनचक्की बसवण्यात येणार आहे. या इमारतीत जवळपास 58 पवनचक्क्या असणार आहेत. प्रत्येक पवनचक्की 3 मेगावॉट एवढी वीजनिर्मिती करणार आहे. या पवनचक्क्यामधून निर्माण होणारी वीज जवळपास 50 कुटुंबे वापरू शकणार आहेत. तसेच इमारतीला वादळी वा-यांपासून कोणतेच नुकसान होणार नाही. कोण आहेत डेव्हिड फिशर ?डेव्हिड फिशर हे इस्रायली-इटालियन वास्तुकार आहेत. त्यांनी या इमारतीची संकल्पना मांडली असून, रचना केली आहे. 2020पर्यंत ही इमारत पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे.

(सौ. यू ट्युब)